One side closed for traffic near goregaon it park because road caved in

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

 गोरेगाव  इथे IT Park जवळ नाल्याला लागून असलेला रस्ता खचला आहे. त्यामुळे IT park ची एक बाजू बंद करण्यात आली आहे. 

इन्फिनिटी पार्क येथे रस्ता खचल्यामुळे आपत्कालीन विभाग यांच्या निर्देशानुसार बस मार्ग क्रमांक ६४६ चे प्रवर्तन अपना बाजार येथे 9.40 वाजल्यापासून खंडित करण्यात आले आहे.

खचलेला रस्त्याचा भाग हा नाल्याजवळील असल्याने परिसरात भितीचे वातावरण आहे. जवळच आयटी पार्क आणि नागरी निवारा परिषदेच्या काही इमारती आहेत. मोठी दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून एक बाजू बंद करण्यात आली आहे. 

खचलेला भाग हा नाल्या जवळच आहे. नाल्यातील पाण्याच्या प्रवाहामुळे नाल्याला लागून असलेला रस्ता रचल्याचे बोलले जात आहे. 

[ad_2]

Related posts