[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
India vs West indies 2nd Test Ashwin : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील अखेरचा कसोटी सामना त्रिनिदाद, पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरु आहे. भारताचा अव्वल फिरकिपटू आर. अश्विन याने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आङे. पहिल्या कसोटी सामन्यात अश्विनने 12 विकेट घेतल्या होत्या. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातही भेदक मारा केला होता. चौथ्या दिवशी दोन विकेट घेत वेस्ट इंडिजच्या फलंदाजीला सुरुंग लावलाय. अखेरच्या आणि निर्णायक दिवशी अश्विन गेम चेंजर ठरेल, असे मोहम्मद सिराज याने सांगितलेय. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना अश्विनपासून दूर राहावे लागेल, असे सिराज म्हणाला.
अश्विनबद्दल काय म्हणाला सिराज –
भारत-वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीवर सिराजने प्रतिक्रिया दिली. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सिराज म्हणाला की, ” खेळपट्टी ज्या प्रकारे बदलत आहे, मला वाटते अश्विन वेस्ट इंडिजच्या फलंदाजीवर प्रभाव पाडेल. खेळपट्टीवर चेंडू वळत आहे. “
Mohammad Siraj said, “Ravi Ashwin will run through the West Indies batting on Day 5, the ball is turning”. pic.twitter.com/I6NlViZZtt
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 24, 2023
पंतची कमी भरली –
ईशान किशन बद्दल बोलताना सिराज म्हणाला, “ईशान किशन आक्रमक फलंदाज आहे. तो नैसर्गिकपणेच आक्रमक फलंदाजी करतो. ऋषभ पंत इथे नाही. पंतच्या अनुपस्थितीत ईशानने त्याची उणीव भरून काढली, असेही सिराज म्हणाला.
स्वत:च्या कामगिरीबद्दल काय म्हणाला ?
दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात सिराजने वेस्ट इंडिजच्या पाच फलंदाजांना बाद केले होते. सिराजच्या कामगिरीचे देशभरात कौतुक झाले. आपल्या कामगिरीबद्दल बोलताना सिराज म्हणाला की, “मला माझ्या कामगिरीला हाय रेट द्यायला आवडेल, कारण पाच विकेट घेणे सोपे नाही.” मी प्लॅनिंगनुसारच गोलंदाजी केली. चेंडू रिव्हर्स स्विंग होत असताना मी लाईन आणि लेन्थ अचूक ठेवली. माझा प्लॅन अतिशय सिंपल होता. जेव्हा चेंडू फार काही करू शकला नाही तेव्हा स्टंप टू स्टंप बॉलिंग करायची असते, असे सिराज म्हणाला.
दरम्यान, सिराजने वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात 23.4 षटकात 60 धावांत 5 बळी घेतले. त्याने यादरम्यान 6 षटके निर्धाव फेकली. अश्विनने 33 षटकात 61 धावा देत एक विकेट घेतली. मुकेश कुमारने 18 षटकात 48 धावा देत 2 बळी घेतले. रविंद्र जडेजाने 25 षटकांत 37 धावा देत 2 बळी घेतले. वेस्ट इंडिजचे खेळाडू आता दुसऱ्या डावात फलंदाजी करत आहेत. अखेरच्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे अद्याप सामना सुरु झाला नाही. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचे दोन फलंदाज तंबूत परतले आहेत, दोघांनाही अश्विनने बाद केले. अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी आठ विकेटची गरज आहे. तर वेस्ट इंडिजला 289 धावांची गरज आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात 32 षटकांत 2 बाद 76 धावांपर्यंत मजल मारली. भारताने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 365 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
[ad_2]