Velhe One Cow And Two Dogs Killed In Tiger Leopard Attack Pune Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

leopard attack : पुणे जिल्ह्यात वाघांच्या आणि बिबट्यांच्या हल्ल्यात चांगलीच (leopard attack) वाढ झाली आहे. आतापर्यंत पुण्याजवळील अनेक परिसरात बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील पाबे गावात बिबट्याच्या हल्ल्यात एक गाय आणि दोन कुत्रे मृत्यूमुखी पडले आहेत. गावातील विठ्ठलवाडी परिसरात शनिवारी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मात्र बिबट्याला जेरबंद करण्यात अद्याप यश आलेले नाही.

पाबे परिक्षेत्र वन अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास एका वाघाने केलेल्या हल्ल्यात गाय आणि दोन कुत्र्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गावच्या सरपंच ज्योती रेणूसे, ग्रामपंचायत सदस्य सुनील रेणुसे पाटील यांच्यासह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी शेतकऱ्याची एक गाय आणि  दोन कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडल्याचे लक्षात येताच याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. 

मात्र आतापर्यंत येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलेले नाही. त्यामुळे गावातील गावकरी दहशतीच्या वातावरणात आहेत. घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहे. दिवसाही भीती वाटत आहे. तातडीने या वाघाला जेरबंद करावे, अशी विनंती गावकरी करत आहेत. घरातून बाहेर निघताना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी कोणत्याच शेतकऱ्यांनी आपले प्राणी वेगवेगळ्या परिसरात सोडू नका. स्वत: बाहेर पडताना शांततेत बाहेर न पडता आवाज करत बाहेर पडा. शिवाय टॉर्ज सोबत ठेवावा. रात्रीच्या वेळी सामसूम परिसरात नागरिकांनी जाऊ नये, असाही सल्ला परिक्षेत्र वन अधिकारी यांनी पाबेमधील नागरिकांना दिला आहे. 

सिंहगडाच्या परिसरात बिबट्याचा वावर

काही दिवसांपूर्वी पुण्यातील पर्यटकांचं हक्काचं ठिकाण असलेल्या सिंहगडाच्या परिसरात बिबट्या आढळून आला होते. त्यामुळे पर्यटनासाठी आणि वर्षाविहारासाठी जाताना आता पर्यटकांना काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घेरा सिंहगडचे माजी सरपंच दिलीप यादव यांच्या बंगल्यावरुन हे फोटो घेण्यात आले होते. मोरदरी गावाच्या अगदी जवळच हा बिबट्या दिसून आला होता. पुणे जिल्ह्यात खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर हा परिसर प्रामुख्याने बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. मात्र आता बिबट्या पुण्याच्या वेशीवर आल्याने चिंतेत भर पडली आहे.

हेही वाचा-

Pune news : पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली, खडकवासला धरणात 70% पाणीसाठा, संध्याकाळी 5 नंतर नदीपात्रात विसर्ग करणार

 

 

[ad_2]

Related posts