[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
भारतीय संघाला दुसऱ्या कसोटटीत विजयासाठी आठ िवकेट्सची गरज आहे. त्यामुळे भारतीय संघाला हा सामना जिंकण्याची सर्वात जास्त संधी आहे. पण भारताच्या मुखातील हा विजयाचा घास एका गोष्टीमुळे हिरावला जाऊ शकतो. त्यामुळे सध्याच्या घडीला भारतीय संघाचे टेंशन वाढलेले असेल. कारण जर ही एक गोष्ट घडली तर भारतीय संघाला विजयासाठी काहीच करता येणार नाही.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा त्रिनिदादमध्ये सुरु आहे. सोमवारी त्रिनिदादमध्ये पाऊस पडण्याची जोरदार शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सोमवारी त्रिनिदादमध्ये ७० टक्के पाऊस पडू शकतो. त्यामुळे आजच्या दिवसातील काही षटके पावसामुळे वाया जाण्याची शक्यता आहे. एकिकडे भारतासाठी प्रत्येक षटक महत्वाचे असेल आणि त्यामध्येच जर पाऊस पडला तर भारताला कमी षटके टाकायला मिळतील. त्यामुळे भारताच्या विजयाची शक्यताही कमी होऊ शकते. त्यामुळे पावसामुळे भारताचे नुकसान होऊ शकते. दुसरीकडे पाऊस हा वेस्ट इंडिजच्या पथ्यावर पडू शकतो. कारण पावसामुळे जर काही षटकं वाया गेली तर वेस्ट इंडिजला कमी षटकं खेळावी लागतील आणि त्यांना सामना अनिर्णीत राखता येऊ शकतो. त्यामुळे पाऊस हा या सामन्यात टर्निंग पॉइंट ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळे पाऊस किती पडतो आणि त्यामुळे किती षटकांचा खेळ वाया जातो, यावर विजयाची समीकरण अवलंबून असणार आहे. त्यामुळे पाऊस हा दोन्ही संघांसाठी महत्वाचा ठरणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा दुसरा कसोटी सामना जय-पराजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. पण यावेळी भारताच्या विजयाच्या मार्गात पाऊस हा व्हिलन ठरू शकतो, असे म्हटले जात आहे.
[ad_2]