[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
काम करा रिझल्टचं टेन्शन घेऊ नका
दुपारी जेव्हा तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी असता तेव्हा कामावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असतेच पण सोबतच स्वतःची देखील काळजी घेणे महत्त्वाचे असते. कधी कधी काम जास्त असू शकते पण तुम्ही ते पूर्ण करण्याचा विचार करा पण त्याचे टेन्शन घेऊ नका. टेन्शनमुळे आयुष्य कमी होते, मग तुम्ही घरी असा किंवा कामावर. काही गडबड झाल्यास विनाकारण काळजी करू नका आणि काम अर्धवट सोडू नका. मोठी कामे लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला आनंद आणि समाधान मिळू शकते.
(वाचा :- पचनशक्ती वाढवतात Ayurveda चे हे 3 साधे नियम, डॉक्टर म्हणाले जे लोक फॉलो करतील त्यांचं आतडं दगड सुद्धा सहज पचवेल)
एकत्र लंच करा
काही लोक एकटे बसून, घाई घाईत किंवा त्यांच्या डेस्कवर एकट्याने खाणे पसंत करतात. त्यांच्या मनात फक्त कामाचा विचार असतो. पण लंच ब्रेक हा एक ब्रेक म्हणूनच वापरायला हवा यावेळी. सहकाऱ्यांसोबत जेवण करा. या दरम्यान कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींबद्दल बोला. दुपारचे जेवण एकत्र आणि योग्य वेळी केल्याने कनेक्शनची भावना निर्माण होते, ज्यामुळे तुम्हाला फ्रेश होण्यास मदत होते.
(वाचा :- ना डाएटिंग-ना एक्सरसाईज, पाण्यात मिसळून प्या हे घरगुती चूर्ण, लोण्यासारखी झर्रकन वितळेल पोट व मांड्यांची चरबी)
चालण्यासाठी वेळ काढा
दिवसभर बसून राहिल्याने अनेक गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. कामातून वेळ काढून जिममध्ये जा, फिरायला जा किंवा कामाच्या ठिकाणी कोणत्याही खेळात किंवा शारीरिक हालचालींमध्ये भाग घ्या. जर खूप बीझी असाल तर किमान वेळ काढून वॉक करायला तरी जा.
(वाचा :- Insulin Resistance : शरीराच्या कोणत्याही भागात हे लक्षण दिसलं तर लगेच डॉक्टरकडे जा, समजून जा खूप वाढलं इन्सुलिन)
थोडे सोशलाइज व्हा
दीर्घायुष्य जगण्यासाठी सोशलाइज होणे आवश्यक आहे. मनुष्य हा नैसर्गिकरित्या एक सोशलाइज प्राणी आहे, म्हणून आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी आपल्याला इतर लोकांशी कनेक्टेड राहणे आवश्यक आहे. तुमच्या सहकार्यांसोबत दुपारचे जेवण करा, कॉफी ब्रेक घ्या किंवा दुपारी तुमच्या आईला किंवा मैत्रिणीला कॉल करा. ही छोटीशी कृतीही तुम्हाला सोशलाइज राहण्यास मदत करते.
(वाचा :- AI Robot पेक्षा गतीमान बनेल मेंदू, करा ही 6 कामं, स्मरणशक्ती व बुद्धी होईल घोड्याहून तेज, मिळेल सर्व कामांत यश)
दुपारी छोटीशी डुलकी घ्या
दुपारी सगळ्यांनाकज झोप येते. पण अशावेळी एक डुलकीही तुम्हाला फ्रेश करण्यासाठी पुरेशी आहे. संशोधकांचा असा विश्वास आहे की कामाच्या दरम्यान थोडीशी झोप घेतल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते. दुपारी 15-30 मिनिटे वेळ मिळेल तशी झोप घ्या.
(वाचा :- पावसाळ्यात गरमागरम चहा पिण्याची वेगळीच मज्जा, पण अजिबात करू नका या 5 चुका, पोटात अॅसिड बनून आतड्यांना बसेल पीळ)
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.
[ad_2]