लक्ष द्या! कल्याण स्थानकात रेल्वे रूळ पाण्याखाली, लोकल वाहतूक उशिराने

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ठाण्यासह डोंबिवली आणि कल्याणमध्ये पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. कल्याण, डोंबिवलीतील रस्त्यांवर पाणी साचले आहे. कल्याण रेल्वे स्थानकातील रूळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे लोकल वाहतूक मंदगतीने सुरू आहे. लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत.

कल्याणमध्ये संध्याकाळच्या सुमारास पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका लोकल सेवेलाही बसला आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे लोकल वाहतूक पंधरा ते वीस मिनिटे उशिराने सुरू आहे.

कल्याण-डोंबिवलीत आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. दुपारी पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. पण दुपारी पुन्हा पावसाचा जोर वाढला. मागील तासाभरापासून कोसळणाऱ्या पावसामुळे कल्याण पश्चिमेकडे छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड परिसरात पाणी साचले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास शहरातील इतर सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते.

ठाण्यात संध्याकाळच्या सुमारास पावसाचा जोर वाढला आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मानपाडा, आनंद नगर, ओवळा या ठिकाणी पावसाचे पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. मेट्रोच्या सुरू असलेल्या कामामुळे पाणी साचलं आहे.

मागील आठ तासांत 88 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर मागील तासाभरात 25 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरातील पाचपाखाडी भागात एका सोसायटीची संरक्षण भिंत कोसळली. सुदैवाने या घटनेत कुणाला दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही.


हेही वाचा

[ad_2]

Related posts