[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
भारतीय संघात यावेळी प्रत्येक स्थानासाठी स्पर्धा सुरु आहे. आज सकाळीच भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज या वनडे मालिकेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्याजागी संघात शार्दुल ठाकूरला संधी मिळेल, असे म्हटले जात होते. वेगवान गोलंदाजांमध्ये शार्दूल ठाकूर, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, मुकेशकुमार असे पर्याय आहेत. हार्दिक पंड्यादेखील चांगली वेगवान गोलंदाजी करू शकतो आणि त्याचे या संघातील स्थान निश्चित समजले जात आहे.
भारतीय संघात यावेळी सूर्यकुमार यादवचे पुनरागमन होणार आहे. ३२ वर्षीय सूर्यकुमार टी-२०त यशस्वी ठरला असला, तरी वन-डेत त्याला अद्याप आपली छाप पाडता आलेली नाही. त्याला २३ वन-डेत २४.०५च्या सरासरीने ४३३ धावाच करता आल्या आहेत. यात त्याला केवळ दोन अर्धशतके ठोकता आली आहेत. त्याला संघातील चौथा क्रमांक कायम राखायचा असेल, तर या मालिकेत मोठ्या खेळी कराव्या लागणार आहेत. अन्यथा, त्या जागेवर लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन असे पर्याय भारताकडे आहेत. त्यामुळे यावेळी भारतीय संघात नेमके कोणते बदल होतात आणि कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
पावसाचा अंदाज
गेल्या वर्षी याच मैदानावर विंडीज-न्यूझीलंडच्या तिन्ही वन-डे खेळविण्यात आल्या. त्यात पहिल्या डावातील धावसंख्या होती १९०, २१२ आणि ३०१. या खेळपट्टीवर गोलंदाजांना चांगली मदत मिळते. खासकरून वेगवान गोलंदाजांना. भारतीय संघ या मैदानावर तीन वन-डे खेळला असून, त्यातील केवळ एकच लढत जिंकता आलेली आहे. भारतीय संघ २००२नंतर येथे प्रथमच खेळणार आहे. यात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून, २० टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
[ad_2]