हार्दिक, संजू अन् सूर्याही फ्लॉप, भारताचा डाव 181 धावांवर गारद, विडिंजला विजयासाठी माफक आव्हान

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
IND vs WI Live Score: वेस्ट इंडिजच्या भेदक माऱ्यापुढे भारताचा डाव 181 धावांवर आटोपला. भारतीय फलंदाजांना संपूर्ण 50 षटकेही फलंदाजी करता आली नाही. चांगल्या सुरुवातीनंतर भारताची फलंदाजी ढेपाळली. भारतीय संघाने 40.5 षटकात 181 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून ईशान किशन याने 55 धावांची खेळी केली. त्याशिवाय शुभमन गिल याने 34 धावांचे योगदान दिले. या दोघांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या ओलांडता आली नाही. वेस्ट इंडिजकडून मोटी आणि शेफर्ड यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. वेस्ट इंडिजला विजयासाठी 182 धावांचे माफक आव्हान आहे.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा डाव 181 धावांवर आटोपला. संघाकडून इशान किशनने अर्धशतक झळकावले. त्याने 55 चेंडूत 55 धावा केल्या. ईशानने या खेळीत 6 चौकार आणि 1 षटकार लगावला. वेस्ट इंडिजला विजयासाठी 182 धावांचे आव्हान मिळालेय. शेफर्डने 8 षटकात 37 धावा दिल्या. मोटीने 9.5 षटकात 36 धावा दिल्या. जोसेफने २ बळी घेतले. यानिक आणि सील्सला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी विराट कोहली यांना आराम देण्यात आला होता. संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांना संधी देण्यात आली. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होप याने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. शुभमन गिल आणि ईशान किशन यांनी डावाची सुरुवात दमदार केली. पहिल्या विकेटसाठी या जोडीने 90 धावांची भागिदारी केली. पण त्यानंतर भारतीय संघाचा डाव ढेपाळला. प्रत्येक फलंदाजांनी ये रे माझ्या मागल्या प्रमाणे विकेट फेकल्या. एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

सूर्यकुमार यादव याने 24 धावांची खेळी करत संघर्ष केला, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. सूर्यकुार यादव याने 25 चेंडूत 24 धावांचे योगदान दिले. ईशान किशन, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांच्याशिवाय एकाही फलंदालाजाला मोठी खेळी करता आली नाही.  विराट कोहलीच्या जागी संघात स्थान मिळालेल्या संजू सॅमसन याने निराश केले. संजू सॅमसन अवघ्या 9 धावा काढून तंबूत परतला. अक्षर पटेल याने एक धाव काढून बाद झाला. कर्णधार हार्दिक पांड्या याला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. हार्दिक पांड्या सात धावांवर बाद झाला. रविंद्र जाडेजा यानेही निराशाजनक कामगिरी केली. जाडेजा 10 धावांवर बाद झाला. शार्दूल ठाकूर याने 16 धावांचे योगदान दिले. कुलदीप यादव याने नाबाद आठ धावांची खेली केली. उमारन मलिक याला खातेही उघडता आले नाही. मुकेश कुमार याने सहा धावांचे योगदान दिले.

[ad_2]

Related posts