[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
रिंकूने लखनौच्या गोलंदाजांची लय बिघडवत ३३ चेंडूंत नाबाद ६७ धावा तडकावल्या. हा आयपीएल मोसम रिंकूने १४९पेक्षा जास्त स्ट्राइर रेटने ४७४ धावा तडकावत खऱ्या अर्थाने संस्मरणीय केला. त्याचे कौतुकही सामान्य क्रिकेट पाठीराख्यांसह दिग्गज आजीमाजी खेळाडूंनी केले. रिंकू मात्र आता पुन्हा नेहमीच्या दैनंदिनीस सुरुवात करणार आहे. ‘घरी परतल्यानंतर पुन्हा माझा रोजचा दिनक्रम सुरू होणार… सराव, मग जिम तसेच आहार आणि झोप. कौतुक होईल, जाणकार माझे नावही घेतील. मला मात्र माझे काम चोख करायचे आहे’, असे हा उत्तर प्रदेशचा क्रिकेटपटू सांगतो.
रिंकूचे नाव झाले आहे, त्यामुळे घरीही सहाजिकच सगळे खूष आहेत. ‘हो तर… कुटुंबीयांचा आनंद गगनात मावत नाही. गेल्या वर्षी मला जेव्हा केव्हा संधी मिळाली, तेव्हा मी छोटेखानी कामगिरी केली होती. त्यामुळे थोडीफार ओळख मिळाली होतीच. मात्र यंदा सलग पाच षटकार लगावल्यानंतर माझी ओळख दृढ झाली आणि आदरही मिळू लागला. अनेक जण आता ओळखू लागले आहेत, पण माझा उत्साह तुलनेत कमीच आहे, कारण आम्ही संघ म्हणून कमी पडलो’, रिंकूचा आवाज गंभीर होतो.
गुजरातप्रमाणे लखनौविरुद्धही जिंकण्यासाठी अखेरच्या तीन चेंडूंवर तीन षटकार खेचायचे होते. मात्र कोलकात्याला यावेळी विजय मिळवून देणे रिंकूला जमले नाही. ‘मी निश्चिंत होतो. चेंडूचा दर्जा पाहून फटके खेळायचे एवढेच मनात होते. गुजरातप्रमाणे सलग पाच षटकार मारण्याचा विचारही होताच. मात्र एका चेंडूवर चौकार बसला, तिथे षटकार वसूल झाला नाही’, रिंकू खिन्न मनाने सांगतो.
कोलकाता नाइट रायडर्सच्या रिंकू सिंगने शनिवारी लखनऊ सुपर जायन्ट्सविरुद्धच्या लढतीत ३३ चेंडूंत नाबाद ६७ धावांची खेळी साकारली. यंदाच्या आयपीएल मोसमातील हे त्याचे पाचवे अर्धशतक ठरले, अशी कामगिरी करणारा तो यंदाच्या मोसमातील कोलकात्याचा एकमेव फलंदाज.
रिंकूने यंदाच्या मोसमात कोलकात्यासाठी ४७४ धावांचे योगदान दिले. २०२३च्या आयपीएल मोसमात कोलकात्याकडून एवढ्या धावा करणारा तो एकमेव फलंदाजही ठरला.
शनिवारी लखनौ सुपर जायन्ट्सविरुद्धच्या सामन्यात कोलकात्याने पॉवरप्लेमध्ये १ बाद ६१ धावा चोपून काढल्या. यंदाच्या आयपीएलमध्ये पॉवरप्लेच्या षटकांत ६० किंवा त्यापेक्षा जास्त धावा ठोकण्याची कोलकात्याची ही चौथी खेप. यंदा पॉवरप्लेमध्ये ६० किंवा त्यापेक्षा जास्त धावा सर्वाधिकवेळा केल्या आहेत त्या राजस्थान रॉयल्सने (सहावेळा).
अशी झाली कामगिरी
१४ सामने, ४७४ धावा, नाबाद ६७ सर्वोच्च, ५९.२५ सरासरी, १४९.५२ स्ट्राइक रेट, ४ अर्धशतके, ३१ चौकार, २९ षटकार.
संघाची अवस्था आणि रिंकूची कामगिरी
३ बाद १६
२८ चेंडूंत ३५
३ बाद ९२
२३ चेंडूंत नाबाद ४२
५ बाद १४२
१५ चेंडूंत ४०
३ बाद ४७
३३ चेंडूंत ४६
३ बाद १२८
२१ चेंडूंत नाबाद ४८
५ बाद ९६
३२ चेंडूंत नाबाद ५८
४ बाद ७०
३३ चेंडूंत नाबाद ५३
३ बाद ३५
३५ चेंडूंत ४६
४ बाद १२४
१० चेंडूंत नाबाद २१
३ बाद ३३
४३ चेंडूंत ५४
३ बाद ८२
३३ चेंडूंत नाबाद ६७
[ad_2]