Karnataka Only Muslim Woman Mla Kaneez Fatima Said Congress Will Lift Hijab Ban

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Kaneez Fatima On Hijab Ban In Karnatka: कर्नाटक निवडणुकांपूर्वी (Karnataka Election 2023) कर्नाटकात हिजाब बंदीचा (Hijab Ban) मुद्दा गाजला होता. त्यानंतर निवडणुकीतही भाजपनं (BJP) ️हिजाबचा मुद्दा लावून धरला होता. कर्नाटक निवडणुकांमध्ये भाजपच्या पराभवाच्या कारणांपैकी एक अत्यंत महत्त्वाचं कारण ‘हिजाब वाद’ (Karnataka Hijab Raw) हेदेखील असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. अशातच कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळालं असून आता काँग्रेसचं नवनिर्वाचित सरकारही स्थापन झालं आहे. अशातच ज्या मतदारसंघातून हिजाब वादाला सुरुवात झालेली, त्या भागातून निवडून आलेल्या कर्नाटकातील एकमेव मुस्लिम महिला आमदार कनीज फातिमा (Congress MLA Kaneez Fatima) यांनी हिजाब वादासंदर्भात एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या एकमेव मुस्लिम महिला आमदार कनीज फातिमा यांनी हिजाब वादाबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, काँग्रेस हिजाबवरील बंदी हटवेल. यासोबतच मुस्लिमांना मिळणारं आरक्षण काँग्रेस पुन्हा लागू करेल, असंही त्या म्हणाल्या आहेत. दरम्यान, कर्नाटक निवडणुकांपूर्वी भाजपनं मुस्लिम समाजाला दिलेलं आरक्षण रद्द करून लिंगायत आणि वोक्कलिगा समाजाचा आरक्षणाचा कोटा वाढवला होता.

द क्विंटमधील वृत्तानुसार, काँग्रेसच्या एकमेव मुस्लिम महिला आमदार कनीज फातिमा यांनी यापूर्वी देखील CAA आणि NRC विरोधात अत्यंत स्पष्ट आणि परखडपणे आपली मतं मांडली आहेत. गुलबर्गा उत्तर मतदारसंघातील आमदार फातिमा यांनी भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांचा सुमारे 3000 मतांनी पराभव केला होता. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ही लढत अत्यंत रंजक ठरली होती. यामागील कारणंही अत्यंत महत्त्वाचं होतं. भाजपनं कर्नाटक निवडणुकीत हिजाबबंदीचा मुद्दा लावून धरला होता. तसेच, हिजाब वादाला गुलबर्गामधूनच सुरुवात झाली होती. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. 

कनीज फातिमा… कर्नाटकमधील एकमेव मुस्लिम महिला आमदार 

कनीज फातिमा यांना काँग्रेस नेतृत्वानं 2018 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवण्यास सांगितलं तेव्हा त्यांना धक्काच बसला होता. सहा वेळा आमदार आणि दोन वेळा कॅबिनेट मंत्री राहिलेले त्यांचे पती कमर उल इस्लाम यांचं निधन होऊन एक वर्षही झालं नव्हतं. त्याच वेळी, हिजाब घातलेली मुस्लिम महिला भारतातील निवडणुकीच्या राजकारणाची पोस्टर फिगर कशी काय बनू शकेल असा प्रश्न होताच. पण असं असूनही, कनीज फातिमा यांनी गुलबर्गा उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास होकार दिला.

news reels Reels

गुलबर्गा उत्तर मतदारसंघावर कनीज यांचे पती दिवंगत कमर-उल-इस्लाम यांनी तब्बल तीन दशकं कब्जा केला होता. ही जागा जिंकून, कर्नाटकच्या 224 सदस्यीय विधानसभेत त्या एकमेव मुस्लिम महिला आमदार ठरल्या आहेत. 

[ad_2]

Related posts