Ipl 2023 Anushka Sharma Reaction On Virat Kohli Century Rcb Vs Gt Match Video Viral On Social Media

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Anushka Sharma Reaction On Virat Kohli Century: काल आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात  आयपीएल 2023 (IPL 2023) सामना झाला. या सामन्यात  गुजरात (GT) संघानं विजय मिळवला पण सध्या सोशल मीडियावर चर्चा  विराट कोहलीने केलेल्या वादळी शतकाची होत आहे. विराट कोहलीने कालच्या सामन्यात 61 चेंडूत नाबाद 101 धावांची खेळी केली.या खेळीत विराट कोहलीने (Virat Kohli) 13 चौकार आणि एक षटकार लगावला. विराटनं शतक झळकावल्यानंतर अनुष्का शर्माची (Anushka Sharma ) रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाली. सध्या अनुष्काचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील विरुष्काच्या रोमँटिक अंदाजानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, विराटनं शतक झळकावल्यानंतर अनुष्कानं विराटला फ्लाइंट किस दिली. त्यानंतर तिनं टाळ्या वाजवून विराटचं कौतुक केलं. व्हायरल व्हिडीओमध्ये अनुष्काच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

पाहा व्हिडीओ

विराट कोहलीचे हे यंदाच्या हंगामातील दुसरे शतक आहे. तर आयपीएलच्या करिअरमधील विराट कोहलीचे सातवे शतक होय. 

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने फलंदाजीचा निर्णय घेत शानदार सुरुवात केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सलामीवीर फाफ डू प्लेसीस आणि विराट कोहली यांनी 7.1 षटकांत 67 धावा केल्या. मायकल ब्रेसवेलने 16 चेंडूत 26 धावा केल्या तर अनुज रावतने 15 चेंडूत 23 धावा केल्या. आरसीबीकडून विराट कोहलीनं शतकी खेळी करत गुजरातला विजयासाठी 198 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण शुभमन गिलच्या स्फोटक खेळीमुळे कोहलीची शतकी खेळी व्यर्थ गेली. शुभमन गिलने स्फोटक फलंदाजी करत सर्वांची मनं जिंकली. 

अनुष्का अनेकवेळा विराटला सपोर्ट करण्यासाठी विविध क्रिकेट सामन्यांना हजेरी लावत असते.  2017 मध्ये अनुष्कानं विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. 2021 मध्ये तिनं मुलगी वामिकाला जन्म दिला.  गेली काही वर्ष अनुष्का शर्मानं अभिनयक्षेत्रातमधून ब्रेक घेतला होता.  आता अनुष्काच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अनुष्का बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन करणार आहे. तिचा ‘चकदा एक्सप्रेस’ (Chakda ‘Xpress) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

IPL 2023 : विराट कोहलीने युनिवर्स बॉसचा विक्रम मोडला,  सातवे शतक झळकावले



[ad_2]

Related posts