[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
सहारनपूर: उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात रविवारी एका तरुण आणि तरुणीने प्रेमप्रकरणातून विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली. हे दोघेही शेजारी असल्याची माहिती आहे. पोलिसांनी माहिती मिळताच त्यांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला.अतिरिक्त पोलिस अधीक्षक (देश क्षेत्र) सागर जैन यांनी सांगितले की, गंगोह पोलिस स्टेशन हद्दीतील मैनपुरा गावात राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीचे तीन वर्षांपूर्वी नवाजपूर गावातील एका व्यक्तीसोबत निकाह झाला होता. पण, अद्याप तिची पाठवणी जाली नव्हती. तर, या तरुणीचं गेल्या पाच वर्षांपासून आपल्याच गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते.
रविवारी मुलीची तिच्या सासरी पाठवणी होणार होती. त्यासाठी सासरची मंडळी जमली होती. माहेरुन मुलीला देण्यात आलेल्या भेटवस्तू सासरी पाठवण्यात आल्या होत्या. याचदरम्यान, या तरुणीने विषारी द्रव्य प्राशन केले. त्यामुळे तिची प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

याची माहिती मिळताच पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. याचदरम्यान, प्रेयसीच्या मृत्यूची माहिती मिळताच शेजारी राहणाऱ्या तिच्या प्रियकरानेही विषारी द्रव्य प्राशन केले आणि मग त्याने थेट पोलिस ठाणे गाठले. त्याची प्रकृती पाहून पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
प्राथमिक तपासात दोघांनी विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे, असं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून दोघांचंही शवविच्छेदन करण्यात आलं आहे. पोलिसांनी याप्रकणी तपास सुरु केला आहे. तसेच, पोलिस याप्रकरणी सर्ज बाजुने तपास करत आहेत.
[ad_2]