कसब्याच्या विकासाचा ब्ल्यू प्रिंट तयार करणार – रवींद्र धंगेकर

प्रगत भारत न्युज पुणे

कसबा विधानसभा मतदारसंघ गेली ३० वर्षे विकासापासून वंचित राहिला आणि त्यास भाजपच जबाबदार आहे. कसब्याचा विकास आणि मतदारसंघातील नागरिक हे केंद्रबिंदू मानून कसब्याच्या विकासाचा ब्ल्यू प्रिंट मी तयार करणार असून त्यामध्ये स्थानिक नागरिक, गणेश मंडळे, प्रभागातील सर्व नगरसेवक, मनपा अधिकारी, आर्किटेक्ट आणि टाऊन प्लॅनिंगचे तज्ञ यांचा सहयोग घेणार आहेत. विकासाचा हा ब्ल्यू प्रिंट समोर ठेवून निर्धारित वेळेत कसब्याच्या विकासाची कामे पूर्ण करून घेण्यासाठी व त्यासाठी भरीव विकासनिधीची तरतूद करून घेण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करेन. असे, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. पदयात्रा संपल्यानंतर ते नागरिकांशी बोलत होते.

प्रभाग क्र. १७, रविवार पेठ-रास्ता पेठ येथून शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता सुरेश कांबळे यांच्या कार्यालयापासून पदयात्रेस सुरुवात झाली. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष आणि मित्र पक्षांचे झेंडे, धंगेकरांच्या कार्याचे फलक, फटाक्यांचा दणदणदणाट याबरोबरच ‘धंगेकर जिंदाबाद’, ‘महाविकास आघाडी जिंदाबाद’ या घोषणांसह पदयात्रेला प्रारंभ झाला.

या पदयात्रेत उमेदवार रवींद्र धंगेकर यांसमवेत माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार आनंतराव गाडगीळ, लता राजगुरू, शिवा भोकरे, दिलीप पवार, जयसिंग भोसले, प्रवीण करपे, सुरेश कांबळे, मंगेश निरगुडकर, अरुण मालेगावकर, राजू शेख, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शांतीलाल सुरतवाला, दत्ता सागरे, गणेश नलावडे, राजेंद्र मुळे, प्रसाद गावडे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विशाल धनवडे, राजेंद्र शिंदे, युवराज पारीख, गणेश शिंदे, योगेश हेंगरे, निलेश राऊत आदी नेते, पदाधिकारी व  कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ही पदयात्रा पुढे क्रांतीचौक मार्गे- गौरी आळी- नेहरू चौक- सुभानशहा दर्गा- सतरंजीवाला चौक- तांबोळी मशीद- गोविंद हलवाई चौक- वीरेंद्र किराड ऑफिस- हमजेखान चौक मार्गे जाऊन गोकुळ वस्ताद तालीम येथे समाप्त झाली.

Related posts