2 YO Baby Girl Died by Heat Stroke as Mother Forget Her in Car For 15 Hours; भीषण उन्हात २ वर्षांच्या चिमुरडीला आई कारमध्ये विसरली, १५ तासांनी आठवलं

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

फ्लोरिडा: भर उन्हात कारमध्ये अडकून एका २ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ती या कारमध्ये तब्बल १५ तास अडकून होती. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेचे वडील ख्रिस्तोफर मॅक्लीन आणि आई कॅथरीन अॅडम्स यांना अटक केली आहे. उन्हाच तीव्रता इतकी जास्त होती की त्या चिमुकलीच्या शरीराचे तापमान ४१.६ अंशांवर पोहोचले होते. कारमध्ये एक ४ वर्षांचा मुलगाही अडकून पडला होता. मात्र, तो बचावण्यात यशस्वी झाला. त्याला सध्या बाल संरक्षण सेवांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, हे प्रकरण अमेरिकेतील फ्लोरिडा येथील आहे. या प्रकरणाचा तपास केला असता या मुलांची आई त्यांना कारमध्ये बंद करून विसरल्याचं आढळून आलं आहे. जेव्हा तिला याची आठवण झाली, तोपर्यंत चिमुरडी बेशुद्ध झालेली होती. त्यानंतर आपत्कालीन क्रमांकावर कॉल केला. पण, वैद्यकीय मदत पोहोचेपर्यंत चिमुरडीचा मृत्यू झालेला होता. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, ही आई आपल्या दोन मुलांना कारमध्ये झोपलेले असताना विसरली होती आणि ही मुलं मध्यरात्रीपासून दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत कारमध्येच अडकून पडली होती.

IPL 2023: नवीन कधी सुधारणार? RCB प्ले ऑफमधून बाहेर पडताच केलं चीड आणणारं काम…
पोलिस अधिकारी म्हणाले, ‘दोन्ही मुले कारमध्ये झोपलेली होती. त्यांनी मुलांना गाडीत सोडण्याचा निर्णय घेतला आणि घरी झोपायला गेले. दुसऱ्यादिवशी दुपारी ३ वाजून ४१ मिनिटांनी त्यांची झोप उघडली आणि मुलं ही अजूनही गाडीत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही. जेव्हा त्यांना आठवलं की मुलं कारमध्येच आहेत तेव्हा त्यांनी कारकडे धाव घेतली. तोपर्यंत २ वर्षांची चिमुकली बेशुद्ध झालेली होती. त्यानंतर वैद्यकीय मदत येईपर्यंत तिचा मृत्यू झाला.

लग्नाच्या तीन महिन्यानंतरही पतीचा मधुचंद्राला नकार, सासूने विचारताच जावयाचं हादरवणारं उत्तर
पोलिसांनी दाम्पत्याच्या घराची झडती घेतली असता तेथे त्यांना ड्रग्ज आढळून आले. अधिकाऱ्याने मुलीच्या मृत्यूचे कारण ड्रग्ज असल्याचं सांगितलं आहे. ड्रग्जच्या नशेत व्यक्ती वास्तविक जगात काय चालले आहे ते विसरतो आणि मग अशा गोष्टी घडतात, असं अधिकारी म्हणाले. पोलिसांनी अॅडम्स आणि मॅक्लीनला अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध अंमली पदार्थ बाळगणे आणि मुलांकडे निष्काळजीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाखोंचा खर्च करून कांद्याला कवडीमोल दर; शेतकऱ्यांनी फिरवला कांद्यावर नांगर

[ad_2]

Related posts