Weather Forecast Rain Update Monsoon Rain Alert India Most Likely To Record Normal Rainfall In Second Half Of Monsoon August-September India Meteorological Department

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Weather Forecast, Rain Update : देशभरात ऑगस्टमहिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील दोन महिने मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. पण पुढील दोन महिने सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाकडून मान्सूच्या पुढील दोन महिन्यांसाठीचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. मान्सूनमध्ये अल निनोचा प्रभाव वाढत जाण्याचा अंदाज आहे. दरम्यान, राज्यात ऑगस्ट महिना कोरडा जाणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. ऑगस्टचा पहिला आठवडा सोडला तर राज्यात पाऊस कोसळण्याची शक्यता कमी आहे, असे हवामान विभागाने म्हटलेय.

देशात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याशिवाय राज्यात देखील सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. देशात पुढील दोन महिने मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  मान्सूनमध्ये अल निनोचा प्रभाव वाढत जाण्याचा अंदाज आहे. मात्र दुसरीकडे आयओडी पॉझिटिव्ह राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अल निनोचा मान्सून मागील दोन महिन्यात कोणताही प्रभाव नाही, आयओडी न्युट्रल आणि पाॅझिटिव्हकडे सरकत असल्याचं मागील दोन महिन्यात चांगला पाऊस आला आहे. 

राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता – 

मुंबई, पुण्यासह राज्यात पावसाने थोडीफार उसंत घेतली आहे.  पण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये  २, ३ आणि ४ ऑगस्ट रोजी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात ऑगस्ट महिना कोरडा जाणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. ऑगस्टचा पहिला आठवडा सोडला तर राज्यात पाऊस कोसळण्याची शक्यता कमी आहे, असे हवामान विभागाने म्हटलेय.

विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २ ऑगस्ट रोजी विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ३ ऑगस्ट रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात अतिमुसळधारेचा अंदाज आहे. दरम्यान, पुढील पाचही दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस मात्र तीव्रता कमी राहणार आहे. 4 ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, जालना आणि परभणीत विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

[ad_2]

Related posts