Indian Cricket Team Most Times Scored 300 Runs In Odis Here Know Stats And Record

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Cricket Stats : तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 351 धावांचा डोंगर उभारलाय. पण तुम्हाला माहितेय का? भारताने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा  300 धावांचा पल्ला पार करण्याचा विक्रम केला आहे. होय… एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा 300 धावांचा टप्पा पार करण्याचा विक्रम आता भारताच्या नावावर जमा झालाय. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताने तब्बल 98 वेळा ३०० पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम केला आहे. या यादीत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाने ९६ वेळा वनडेमध्ये तीनशे धावांचा टप्पा पार केला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यानंतर दक्षिण आफ्रिका या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण अफ्रिका  संघाने वनडेमध्ये आतापर्यंत 80 वेळा  300 धावांचा पल्ला पार केला आहे. पाकिस्तान या यादीत चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तान संघाने आतापर्यंत वनडेमध्ये  72 वेळा तीनशे धावांचा टप्पा पार केला आहे.  त्यानंतर या यादीत श्रीलंका, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांचा क्रमांक लागतो. त्यांनी अनुक्रमे 64, 61 आणि 56 वेळा वनडेमध्ये 300 धावांचा टप्पा पार केला. 

याशिवाय इतर संघांबद्दल बोलायचे झाले तर, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, बांगलादेश आणि आयर्लंडचे संघांनीही तीनशे धावांचा टप्पा पार केला आहे.  वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, बांगलादेश आणि आयर्लंड या संघांनी एकदिवसीय क्रिकेट इतिहासात अनुक्रमे 35, 26, 21 आणि 11 वेळा 300 धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्यानंतर स्कॉटलंड संघाचा क्रमांक लागतो. स्कॉटलंडने हा पराक्रम 9 वेळा केला आहे. अफगाणिस्तानचे नाव स्कॉटलंड संघानंतर येते. अफगाणिस्तानने एकदिवसीय इतिहासात 5 वेळा 300 धावांचा आकडा गाठला आहे.

चार जणांची अर्धशतके, भारताचा ३५१ धावांचा डोंगर
 तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला विजयासाठी 352 धावांचे आव्हान दिलेय. भारताकडून चार फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली. हार्दिक पांड्याने जबराट फिनिशिंग टच दिला. तर ईशान किशन आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरुवात दिली. संजू सॅमसन यानेही दमदार अर्धशतक झळकावले. भारताने निर्धारित 50 षटकात पाच विकेटच्या मोबदल्यात 351 धावांपर्यंत मजल मारली.  ईशान किशन ७७, शुभमन गिल ८५, संजू सॅमसन ५१ आणि हार्दिक पांड्या ७० धावांची खेळी केली. तीन सामन्याची मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. अखेरचा कसोटी सामना जिंकून भारतीय संघ मालिका खिशात घालण्याची शक्यता आहे. 

[ad_2]

Related posts