[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
राज्यात पुन्हा पावसाचं (Rain update) आगमन होणार आहे. हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्विटरवर याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय. त्यामुळे महाराष्ट्रात पुढच्या पाच दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधात पावसाची शक्यता आहे. (Mumbai rain update news)
“बांगलादेश किनार्यावर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (Deep Depression) निर्माण झालंय. संध्याकाळपर्यंत ते खेपुपाराच्या पूर्वेला बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. नंतर, पुढील 24 तासांत Gangetic West Bengal ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे”, असं के एस होसाळीकर यांनी आज ट्विटरवर सांगितलं आहे.
जुलै महिन्यात पावसाने काही ठिकणी रेकॉर्ड मोडले असले तरी ऑगस्ट महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण तरीही पाऊस पडणार नाही, असं होणार नाही.
पुढचे तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात घाट परिसरात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
[ad_2]