Hardik Pandya is Unhappy With West Indies Cricket Board Know What He said after IND vs WI 3RD ODI; मालिका विजयानंतर वेस्ट इंडिज बोर्डावर हार्दिक पांड्या भडकला, सामन्यानंतर सर्वांसमोर सुनावले

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

त्रिनिदाद: तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाने २०० धावांनी मोठा विजय मिळवत मालिका आपल्या नावे केली. तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ भारतासमोर फार काळ टिकू शकला नाही. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ३५१ धावा केल्या आणि त्यानंतर गोलंदाजांनी यजमान संघाला फक्त १५१ धावांत गुंडाळले. या विजयासह भारताने वेस्ट इंडिजच्या पराभवाची मालिका सुरूच ठेवली आहे. टीम इंडियाच्या विजयानंतर सर्वजण आनंदी दिसले, पण या सामन्यात कर्णधार असलेला हार्दिक पंड्या भडकलेला दिसला. पाहा नेमकं काय घडल.

हार्दिक पांड्याला का राग आला?

हार्दिक पांड्याने सामन्यानंतर सांगितले की, “जेव्हा आम्ही गेल्या वेळेस वेस्ट इंडिज दौऱ्यावर आलो होतो तेव्हा व्यवस्था अधिक चांगली करता आली असती. पण त्यावेळीही त्रास झाला आणि यावेळीही तोच त्रास झाला आहे. वेस्ट इंडिज बोर्डाने याची काळजी घ्यावी. पांड्या म्हणाला की, आम्हाला कुठलीही लक्झरी ट्रीटमेंट नको आहे पण मूलभूत सुविधा असायलाच हव्यात.” या दौऱ्यावर टीम इंडियाला प्रवासादरम्यान थोडा त्रास सहन झाल्याचे वृत्तही कानावर आले होते. कदाचित याच मुद्द्यावरून हार्दिकने सामन्यानंतर हे सर्वांसमोर मांडले असावे.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

वेस्ट इंडिजच्या बोर्डात गोंधळाचे वातावरण?

वेस्ट इंडिज बोर्डाच्या अव्यवस्थेमुळे केवळ मैदानच नाही तर क्रिकेटचा दर्जाही घसरला आहे. या गोंधळामुळे त्यांचे अव्वल खेळाडू त्यांच्याच संघासोबत खेळण्याऐवजी विविध टी-२० लीग खेळत आहेत आणि या गदारोळामुळेच हार्दिक पांड्याने हे प्रकरण सार्वजनिक व्यासपीठावर मांडले. वेस्ट इंडिज बोर्डात सर्वकाही अलबेल नसल्याचे यावरून दिसत आहे; असे आपण म्हणू शकतो.

भारतीय संघाच्या फलंदाजीने चमकदार कामगिरी केली. किशन आणि गिल या सलामीच्या जोडीने १४३ धावांची भर घातली. किशनने ७७ आणि गिलने ८५ धावा केल्या. याशिवाय संजू सॅमसनची बॅटही चांगलीच तळपली, त्याने झटपट ५१ धावा केल्या. कर्णधार हार्दिक पंड्याने ५२ चेंडूत ७० धावांची खेळी केली. गोलंदाजीत शार्दुल ठाकूरने ४ आणि मुकेश कुमारने ३ विकेट घेतले.

[ad_2]

Related posts