सर्व रेल्वे पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य तपासण्यात येणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमधील (Jaipur Express Terror Attack) गोळीबाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलिसांच्या मानसिक आरोग्याचा आढावा घेण्यात येणार असून, सक्षम पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनाच शस्त्र बाळगण्याची मुभा देण्याची चाचपणी करण्याच्या हालचाली रेल्वे पोलिसांनी सुरू केल्या आहेत.

राज्य लोहमार्गाचे मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर असे चार विभाग आहेत. यातील सर्व रेल्वे पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांची मानसिक आरोग्य तपासण्यात येणार आहे. संबंधित विभागप्रमुखांकडून ही चाचणी घेण्यात येईल.

चाचणी यशस्वीपणे पार करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनाच प्रवासी सुरक्षिततेसाठी शस्त्र वापरण्याची मुभा देण्यात येईल, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

रेल्वे संरक्षण दलाच्या (RPF)एका हवालदाराने सोमवारी पालघर रेल्वे स्थानकाजवळ चालत्या जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये वरिष्ठ सहकारी आणि तीन प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

मीरा रोड आणि दहिसर स्थानकांदरम्यान (मुंबई उपनगरीय नेटवर्कवर) थांबलेल्या ट्रेनची साखळी ओढून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना RPF च्या हवालदाराला पकडण्यात आले. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. 

कॉन्स्टेबल चेतन सिंग (३४) याने आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक टिका राम मीना आणि B5 कोचमधील अन्य एका प्रवाशाला त्याच्या रायफलने गोळ्या घालून ठार केले.

त्याने B6 कोचमधील आणखी एका प्रवाशाला गोळ्या घालून ठार केले, आणि B5 आणि B6 डब्यांच्या दरम्यान असलेल्या पॅन्ट्री कारमधील आणखी एकाची हत्या केली, असे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.


हेही वाचा

“भारतात राहायचंय तर फक्त मोदींना, योगींना मत द्या”, गोळीबारीनंतरचा RPF कॉन्स्टेबलचा व्हिडिओ व्हायरल

[ad_2]

Related posts