[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
KL Rahul Comeback Update Team India : आशिया चषक आणि विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक वृत्त समोर आलेय. होय.. अनुभवी केएल राहुल याने सरावाला सुरुवात केली आहे. दुखापतीमुळे मागील तीन ते चार महिन्यापासून केएल राहुल क्रिकेटपासून दूर होता. पण आता तो पुनरागमनासाठी सज्ज झालाय. बेंगळुरु येथील एनसीएमध्ये केएल राहुल कसून सराव करत आहे. फलंदाजीसोबतच विकिटकिपिंगचा सरावही राहुल करत आहे. केएल राहुल याच्या तयारीचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. केएल राहुलने भारतासाठी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना मार्च 2023 मध्ये खेळला होता.
विकेटकीपर फलंदाज केएल राहुल याला आयपीएल 2023 दरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर क्रिकेटच्या मैदानापासून राहुल दूरच होता. राहुलवर शस्त्रक्रियाही पार पडली. त्यानंतर आता केएल राहुल याने पुनरागमनासाठी कंबर कसली आहे. राहुल दुखापतीमधून पूर्णपणे सावरलाय. बेंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेसवर काम केलेय. आता राहुल पुनरागमनासाठी सज्ज झालाय. राहुल फलंदाजी आणि विकेकटिपिंगचा सराव करत आहे. राहुलसोबतच जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर आणि प्रसिद्ध कृष्णाही दुखापतीमधून सावरले आहेत. जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा यांना आयरर्लंड दौऱ्यात संधी देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराह या दौऱ्यात भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. राहुल आणि श्रेयस यांना अद्याप प्रतिक्षाच करावी लागेल.
केएल राहुल याने भारतासाठी अखेरचा कसोटी सामना फेब्रुवारी 2023 मध्ये खेळला होता. तर वनडे सामना मार्च 2023 मध्ये खेळला होता. 10 नोव्हेंबर 2022 रोजी अखेरचा टी20 सामना खेळला आहे. आयपीएल 2023 दरम्यान आरसीबीविरोधीत सामन्यादरम्यान राहुल दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर राहुल आता पुनरागमनासाठी सज्ज झालाय. आशिया चषक आणि वर्ल्ड कपच्या आधी भारतीय संघासाठी ही दिलासादायक बाब आहे. विश्वचषक भारतामध्ये होणार आहे. राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करतो, शिवाय विकेटकिपिंगची भूमिकाही बजावतो. त्यामुळे राहुलचं पुनरागमन भारतासाठी फायदेशीरच आहे. राहुलच्या सरावाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
KL Rahul has started wicket-keeping practice.❤️🔥🤩 #KLRahul pic.twitter.com/Zyb7ckcWLP
— Pawan kumar (@Pawanar02106943) August 2, 2023
#BCCI #KLRahul
Great news for the Indian team.KL Rahul has started wicket-keeping practice. Comeback gonna be brutal 🔥🔥🔥pic.twitter.com/kKwMI68geQ
— 👌👑🌟🌶️ (@superking1816) August 2, 2023
Comeback will be bigger, stronger than setback. @klrahul
You might troll, criticise him but everyone knows his importance in Upcoming worldcup. #Klrahul #CricketTwitter pic.twitter.com/dxcXffrb39
— Vishwas_Bajwa (@SinghGurvishwas) August 2, 2023
KL Rahul has started wicketkeeping practice. pic.twitter.com/2iGefgeqc7
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 2, 2023
Great news for the Indian team.
KL Rahul has started wicket-keeping practice. pic.twitter.com/1aCmcCW1LL
— Johns. (@CricCrazyJohns) August 2, 2023
[ad_2]