मूर्तिकारांसाठी आली गुड न्यूज, वाचा BMCचे 11 मोठे निर्णय

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

महापालिका मुख्यालयात मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाचा पार्श्वभूमीवर पूर्व तयारी संदर्भात आढावा बैठक पार पडली. 

बैठकीत गणेश मूर्तिकार / मूर्ती साठवणूकदार यांना परवानगीसाठी असलेली १ हजार रुपये असलेली अनामत रक्कम कमी करून ती आता १०० रुपये करण्याचा महत्वाचा निणय आज घेण्यात आला.

यासोबतच गणेशोत्सवाच्या १५ दिवस आधी विसर्जन मार्गाचा आढावा घेऊन योग्य ती खबरदारी घेणे, विसर्जनाचे सर्व मार्ग व त्यावरील सर्व रस्ते खड्डेमुक्त करणे, शहरात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची संख्या वाढवणे, पीओपी मूर्ती विसर्जन झाल्यानंतर त्यांचे योग्य पद्धतीने विघटन केले जाईल याची काळजी घेण्याबाबत देखील निर्देश देण्यात आले.

आजच्या बैठकीतील सविस्तर मुद्दे

१.    गणेश मूर्तिकार / मूर्ती साठवणूकदार यांना परवानगीसाठी असलेली रु.१०००/- असलेली  अनामत रक्कम कमी करून ती रु. १००/- करण्यात आली. 

२.    गणेशोत्सवाच्या विसर्जन काळामध्ये मुंबई महापालिकेच्या वतीने गणेश भक्तांचे तोंड गोड करण्याची व्यवस्था महापालिकेमार्फत करण्यात येईल. 

३.    विसर्जनाचे सर्व मार्ग व त्यावरील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यात येतील. 

४.    चिनी बनवटीच्या मूर्तींवर आळा तसेच प्रतिबंध घालण्यासाठी पाउले उचलली जातील. 

५.    प्रत्येक गणेश मंडळाकडे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी दिवसातून ३ वेळा महापालिकेच्या वतीने साफसफाई  केली जाईल.

६.    सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी आरोग्य शिबिरे भरविण्यात येतील.

७.    गणेशोत्सवाच्या १५ दिवस आधी विसर्जन मार्गाचा आढाव घेऊन योग्य ती खबरदारी घेतली जाईल. 

८.    गत वर्षी विसर्जन मिरवणुकितील विसर्जनास नेण्यात येणाऱ्या वाहनांवर / गणेश मिरवणुकितील गणेश भक्तांवर पोलीस खटले दाखल केलेले आहेत. ते काढण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल.

९.    शहरात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची संख्या वाढवली जाईल. 

१०.    पीओपी मूर्ती विसर्जन झाल्यानंतर त्यांचे योग्य पद्धतीने विघटन केले जाईल. 

११.    गणेश विसर्जनावेळी काही अडथळे आल्यास त्याकडे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी असे आदेश पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी दिले.


हेही वाचा

महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांसाठी गुड न्यूज

[ad_2]

Related posts