Maharashtra News Nashik News Chhagan Bhujbal Criticizes BJP After Karnataka Election Results

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nashik Chhagan Bhujbal : ‘ज्या अर्थी दंगली ना सुरुवात झाली, त्याअर्थी निवडणूक जवळ आली. जिथे जिथे निवडणूक आली, तिथे हिंदू मतांना आकर्षित केले जात आहे. कर्नाटकमध्ये हिजाब, बजरंग बलीचा वापर झाला. शेवटी काय तर पराभव झालेला दिसून आला. निवडणुकीमध्ये देवाला टाकले तरी पराभव झाला. त्यामुळे धार्मिक मुद्यावर निवडणूक जिंकल्या जाणार नाही, असा सूचक सल्ला छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिला आहे. 

आज राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे नाशिकमध्ये (Nashik) होते. एकीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना आज ईडीने (ED) चौकशीसाठी बोलवल्याने राज्यात आंदोलने करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (NCP Protest) वतीने आंदोलन करण्यात आले. तर छगन भुजबळ यांनी देखील ईडी प्रकरणासह इतर अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. मागील आठवड्यात राज्यातील अनेक भागात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. यावरुन राजकीय वातावरण सुद्धा तापल्याचे दिसून आले होते. तसेच कर्नाटक निवडणूक निकालानंतर अनेक भागातील प्रतिक्रिया उमटल्याचे दिसून आले. यावर छगन भुजबळ सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. 

छगन भुजबळ यावेळी म्हणाले की, “ज्या अर्थी दंगलीना सुरुवात झाली, त्याअर्थी निवडणूक जवळ आली. जिथे जिथे निवडणूक आली, तिथे हिंदू मतांना आकर्षित केले जात आहे. कर्नाटकमध्ये हिजाब, बजरंग बलीचा वापर झाला. शेवटी काय तर पराभव झालेला दिसून आला. एवढा प्रचंड पराभव होईल, अस वाटले नव्हते. आता देशाला कळाले, बजरंग बलीचे नाव घ्या आणि मतदान करा. पण त्याने काही होत नाही. निवडणुकीमध्ये देवाला टाकले तरी पराभव झाला. त्यामुळे धार्मिक मुद्यावर निवडणूक जिंकल्या जाणार नाही,” असा सूचक सल्ला छगन भुजबळ यांनी दिला आहे. “भाजपाकडे लॉंड्री आहे, त्यांच्यांकडं जे येतात ते स्वच्छ करतात. यंत्रणांवर दबाव टाकण्याचा हेतु नाही. आमच्या प्रांताध्यक्षावर कारवाई होत असताना आम्ही गप्प बसयाचे का?” असा सवाल छगन भुजबळ यांनी यावेळी उपस्थित केला. 

राष्ट्रवादीकडून आंदोलन 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सोमवारी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून चौकशी होणार असल्याने या कारवाई विरोधात युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अंबादास खैरे आणि जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आली. यावेळी भाजपा हमसे डरती है! … ईडी को आगे करती है…, पन्नास खोके.. ईडी पण ओके.. अशी घोषणाबाजी करण्यात येत होती. 

[ad_2]

Related posts