Team India Playing XI For IND vs WI 1st T20 ; पहिल्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात होणार मोठे बदल, जाणून घ्या Playing XI

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

त्रिनिदाद : वनडे मालिका संपली आणि आता दोन्ही संघांतील टी-२० सीरिजला सुरुवात होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिली टी-२० सामना हा गुलुराव ३ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या पहिल्याच सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळतील.

भारतीय संघात सर्वात मोठा प्रश्न हा सलामीचा असणार आहे. कारण या संघात इशान किशन, शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल असे तीन दमदार सालीमीवीर आहेत. या तिघांपैकी कोणाला संघात स्थान द्यायचे हा मोठा प्रश्न भारतीय संघापुढे असेल. कारण गिल आणि इशान चांगल्या फॉर्मात आहेत, तर यशस्वी कसोटी मालिका दमदार फॉर्मात होता. त्यामुळे आता टी-२० मालिकेत कोणाला संधी द्यायची, हा प्रश्न हार्दिक पंड्याला सोडवावा लागेल. पण यशस्वीला यावेळी संघात स्थान मिळेल असे संकेत मिळत आहेत. त्याचबरोबर या संघात अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई हे चार चांगले फिरकी गोलंदाज आहेत. त्यामुळे या चौघांपैकी कोणत्या दोघांना संघात खेळवायचे हा मोठा प्रश्न भारतीय संघाला सोडवावा लागणार आहे. रवी आणि चहल यांना या सामन्यात संधी मिळेल, असे दिसत आहे. त्यामुळे या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत.

भारताचा टी-२० संघ: इशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज टी-२० संघ : रोवमन पॉवेल (कर्णधार), काइल मेयर्स (उपकर्णधार), जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाइ होप, अकील हुसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेड मॅककॉय, निकोलस पूरन, रोमारिओ शेफर्ड, ओडीन स्मिथ, ओशने थॉमस.

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

टी-२० कार्यक्रम : पहिली टी-२० : ३ ऑगस्ट – तरौबा, त्रिनिदाद; दुसरी टी-२० : ६ ऑगस्ट – गयाना; तिसरी टी-२० : ८ ऑगस्ट – गयना; चौथी टी-२० : १२ ऑगस्ट – फ्लोरिडा; पाचवी टी-२० : १३ ऑगस्ट – फ्लोरिडा.

[ad_2]

Related posts