Ishan kishan And Sanju Samson May Be out of team India In Asia Cup 2023 ; इशान आणि संजू दोघांचेही संघातील स्थान धोक्यात, भारताचा हुकमी एक्का आशिया चषकात परतणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : इशान किशनने वेस्ट इंडिजचा दौरा आतापर्यंत गाजवला आहे. संजू सॅमसननेही अर्धशतक झळकावत आपण फॉर्मात आल्याचे दाखवून दिले आहे. पण भारतीय संघातील या दोघांचा पत्ता कट होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण भारतीय संघातील हुकमी एक्का समजला जाणारा खेळाडू आता पुनरामगन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे आशिया चषकात या दौघांऐवजी तोच मैदानात उतरण्याचे संकेत मिळत आहेत.

टीम इंडियाचा यष्टीरक्षक व फलंदाज केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त आहे. गेल्या आयपीएलमध्ये त्याला दुखापत झाली आणि तो टीम इंडियातून बाहेर पडला होता. यामुळे तो जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही सहभागी होऊ शकला नाही. राहुलने आता त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्याने विकेटकीपिंगसह फलंदाजी करताना बरेच चौकार आणि षटकार मारले आहेत. या परिस्थितीत त्याचा मजबूत नेट सराव पाहून तो आशिया कप संघात सामील होऊ शकतो, असे मानले जात आहे. कारण राहुल कितीही फ्लॉप असला तरी तो संघात कायम असतो, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे इशान आणि संजू हे दोघेही फॉर्मात असले तरी त्यांचा पत्ता कट करून राहुलला संघात स्थान मिळणार हे जवळपास निश्चित समजले जात आहे.

आगामी आशिया चषक स्पर्धेत केएल राहुलकडून पुनरागमनाची अपेक्षा आहे. आयपीएलदरम्यान राहुलच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करावी लागली. आता तो पूर्णपणे फिट दिसत आहे. कारण त्याने सरावाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या परिस्थितीत तो लवकरच टीम इंडियामध्ये परत येऊ शकतो. त्यामुळे आता आशिया चषकात त्याला भारतीय ंसघात स्थान मिळणार हे निश्चित समजले जात आहे.

इशान किशन आणि संजू सॅमसनचं काय होणार?
केएल राहुलच्या पुनरागमनामुळे इशान किशन आणि संजू सॅमसन यांच्यावर संघावर टांगती तलवार असू शकते. वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियामध्ये इशान किशन आणि संजू समय यांचा समावेश आहे. इशान किशनने कसोटी आणि एकदिवसीय मालिकेतही चमकदार कामगिरी केली आहे. त्याचवेळी संजू सॅमसनने तिसऱ्या वनडेतही अप्रतिम फलंदाजी दाखवली.

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

या परिस्थितीत केएल राहुलचे पुनरागमन झाल्यास इशान किशन आणि संजू सॅमसन यापैकी एकाला संघातून वगळावे लागू शकते. पण यावेळी संधी मात्र राहुलला मिळणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.



[ad_2]

Related posts