After RCB Loss Match Against Gujarat And End Their IPL Journey Mumbai Indians Player Celebrated To Reach Playoff Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mumbai Indians Player Celebrated To Reach Playoff : अखेरच्या साखळी सामन्यात गुजरातने आरसीबीचा (RCB) सहा गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे आरसीबीचे प्लेऑफमध्ये जाण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. गुजरातकडून शुभमन गिलने (Shubhaman Gill) जसा विजयाचा षट्कार लावला तेव्हाच मुंबईचा प्लेऑफमधील प्रवेश निश्चित झाला. गुजरात,चेन्नई आणि लखनौने आधीच आपले प्लेऑफ पोहचले होते.  आरसीबीला मिळालेल्या पराभवानंतर मुंबईनेही प्लेऑफमध्ये प्रवेश मिळाला. शुभमन गिल याने विजयी षटकार मारल्यानंतर मुंबईच्या खेळाडूंनी जल्लोष केला. इशान किशनसह सर्वच खेळाडूंनी जल्लोष केला. याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. 

आयपीएल 2023 मधील  शेवटच्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्ससंघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केला. गुजरातने आरसीबीवर सहा विकेट्सने विजय मिळवला. यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलं. या सामन्यात विराट कोहलीनं (Virat Kohli) दमदार शतक झळकावलं पण, त्याच्या शतकावर गुजरातच्या शुभमन गिलचं शतक वरचढ ठरलं. कोहलीची शतकी खेळी व्यर्थ ठरली. यामुळे आरसीबी संघ आणि चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. 

गुजरातने जेव्हा हा सामना आपल्या बाजूने वळवला तेव्हा मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) खेळाडूंनी प्लेऑफमध्ये पोहचल्याचा आनंद साजरा केला. सोशल मिडीयावरुन समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ईशान किशनपासून ते पीयूष चावलापर्यंत सगळे खेळाडूंनी जल्लोष केल्याचे दिसतेय.  गुजरात आणि आरसीबी या सामन्याकडे मुंबईच्या खेळाडूंचे लक्ष होते.  मुंबईचे प्लेऑफचे स्थान आरसीबीच्या पराभवावर अवलंबून होते. गुजरातने आरसीबीचा पराभव केल्यानंतर मुंबईच्या खेळाडूंनी आनंद साजरा केला. शुभमन गिलने विजयाची धाव घेतली तेव्हा मुंबईच्या संघाने जल्लोष केला. 

मुंबई इंडियन्स 21 मे रोजी आरसीबीच्या सामन्याआधी मुंबईने आपला सामना हैद्राबाद विरुद्ध खेळला होता. या सामन्यामध्ये कैमरुन ग्रीनने 47 चेंडूमध्ये शतकांची दमदार खेळी खेळली. या विजयासह मुंबईचा संघ 16 अंकांसह टॉप-4 मध्ये जागा मिळवली आहे. 

आता एलिमिनेटर सामन्यात मुंबईची लखनौशी लढत

आयपीएलच्या या हंगामातील प्लेऑफचे सामने 23 मे पासून सुरु होणार आहेत. पहिली क्वालिफायर सामना गुजरात आणि चेन्नईमध्ये 23 मे रोजी खेळवण्यात येईल. तसेच 24 मे रोजी मुंबई आणि लखनौमध्ये एलिमिनिटरचा सामना खेळवण्यात येईल. हे दोन्ही सामने चेन्नईच्या एमए.चिदंबरम मैदानावर खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरा क्वालिफायरचा सामना 26 मे आणि 28 मे रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी मैदानावर खेळवण्यात येईल.  

महत्त्वाच्या इतर बातम्या :

IPL 2023 : RCB च्या पराभवानंतर नवीन उल हकनं कोहलीला डिवचलं; इंस्टाग्राम स्टोरी चर्चेत



[ad_2]

Related posts