Sai Sudharsan Not Given Chance In Team India For West Indies T20 Series Explosive Six Hitter Hardik Pandya Cricket

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Team India Hardik Pandya News : भारतीय टी-20 संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) त्याच्या एका जिवलग मित्राची निराशा केली आहे. हार्दिक पांड्याने आपल्या जिवलग मित्राला टीम इंडियात  (Team India) खेळवण्याचे स्वप्ने दाखवून संधी दिली नाही. साई सुदर्शन असं तामिळनाडूच्या या डावखुऱ्या स्फोटक फलंदाजाचं नाव आहे. सध्या वेस्ट इंडिज (west indies) विरुद्ध पाच सामन्यांच्या टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेसाठी साई सुदर्शनची (sai sudharsan) निवड होणार हे निश्चित होते. मात्र, अचानक या फलंदाजाकडे टी-20 मालिकेसाठी दुर्लक्ष करण्यात आल्याचे समोर आले आहे. 

यावर्षी झालेल्या आयपीएलमध्ये साई सुदर्शनने चमकदार कामगिररी केली होती. त्यामुळं तो  भारतीय टी-20 संघात पदार्पण करण्याचा प्रबळ दावेदार मानला जात होता. कारण कर्णधार हार्दिक पांड्याने देखील आयपीएल 2023 (IPL) दरम्यान सांगितले होते की, लवकरच तामिळनाडूचा डावखुरा स्फोटक फलंदाज साई सुदर्शन भारतासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करु शकतो. परंतू, या फलंदाजाला वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत संधी देण्यात आली नाही.

फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 47 चेंडूत 96 धावांची संस्मरणीय खेळी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत, हार्दिक पंड्या हा भारताचा कर्णधार आहे. त्याने त्याच्या नेतृत्वाखालील संघात साई सुदर्शनला संधी दिली नाही. IPL 2023 च्या हंगामात हार्दिक पंड्याने स्वतः सूचित केले होते की साई सुदर्शन लवकरच भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करू शकेल. साई सुदर्शनने IPL 2023 च्या सीझनमध्येच त्याची चमकदार कामगिरी दाखवली होती. तो कसा स्फोटक आणि तुफानी फलंदाज आहे हे सर्वांनी पाहिलं होतं. 21 वर्षीय साई सुदर्शनने गुजरात टायटन्ससाठी आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 47 चेंडूत 96 धावांची संस्मरणीय खेळी केली होती.

IPL 2023 च्या हंगामात 8 सामन्यांमध्ये 362 धावा 

फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध साई सुदर्शनने केलेल्या स्फोटक खेळीत 8 चौकार आणि 6 षटकार मारले होते. साई सुदर्शनच्या या खेळीच्या जोरावरच गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जसमोर 215 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. हा सामना चेन्नई सुपर किंग्जने पाच विकेटने जिंकून पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपला कब्जा केला. जरी या सामन्याच चेन्नई जिंकली असली तरी साई सुदर्शनने IPL 2023 च्या 8 सामन्यांमध्ये 362 धावा करून टीम इंडियामध्ये निवड होण्याचा दावा केला होता.

भारताचा T20 आंतरराष्ट्रीय संघ 

इशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.

महत्त्वाच्या बातम्या:

IND vs WI 3rd ODI: भारताचा विडिंजवर 200 धावांनी विजय, मालिकाही 2-1 ने खिशात

[ad_2]

Related posts