Apple-may-launch-iphone-15-series-on-september-13-here-is-how-to-watch Marathi News | IPhone 15 Series Launch Date : आयफोन 15 सप्टेंबरमध्ये ‘या’ दिवशी होणार लॉन्च; ‘ही’ असतील खास वैशिष्ट्य

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

iPhone 15 Series Launch Date : iPhone 15 या वर्षातील सर्वात लोकप्रिय लॉन्चपैकी एक असेल. दरवर्षी अमेरिकन कंपनी Apple सप्टेंबर महिन्यात आपला नवीन iPhone लाँच करते. दरवर्षी अधिकृत लॉन्च होण्यापूर्वी फोनबद्दलचे अनेक तपशील लीक होतात. iPhone 15 बाबतही अनेक बातम्या समोर आल्या आहेत. आयफोनची लॉन्च तारीख कधी असेल? या नेमकी कोणती वैशिष्ट्ये आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आयफोनची किंमत किती असेल? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

Apple च्या आगामी iPhone 15 सीरिजबद्दल प्रत्येकजण उत्सुक आहे. आयफोनच्या प्रत्येक मोबाईलमध्ये काहीतरी वैशिषट्य असतं. त्याचप्रमाणे यावेळीही ही सीरिज काही बदलांसह येणार आहे. यात सर्वात मोठा बदल म्हणजे USB Type-C चार्जिंग. याशिवाय आयफोन सीरीजमध्ये लोकांना काही उत्तम अपडेट्स मिळणार आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, iPhone 15 सीरीज 13 सप्टेंबरला आपला आयफोन लॉन्च करण्याची शक्यता आहे. ऍपल पार्क, कॅलिफोर्निया येथे लॉन्च इव्हेंट आयोजित केला जाईल. तुम्ही हा इव्हेंट ऍपलच्या अधिकृत वेबसाईट आणि YouTube द्वारे ऑनलाईन पाहू शकता. 

iPhone 15 ची संभाव्य वैशिष्ट्ये

iPhone 15 मध्ये 6.1-इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्ले दिला जाण्याची अपेक्षा आहे. असे म्हटले जात आहे की, त्याच्या सर्व मॉडेल्समध्ये डायनॅमिक आयलँड-स्टाईल डिस्प्ले असेल. गेल्या वर्षीपर्यंत ते प्रो मॉडेलपुरते मर्यादित होते. कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, आयफोन 15 पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रोसेसरसह ऑफर केला जाऊ शकतो. असेही सांगितले जाते की या नवीन सीरिजमध्ये A16 बायोनिक चिपसेट दिला जाऊ शकतो.

कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर, iPhone 15 मध्ये 48-मेगापिक्सेल इमेज सेन्सरसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. त्यात सॉफ्टवेअर अपग्रेडही दिले जाऊ शकते. iPhone 15 वरून चांगल्या बॅटरी बॅकअपची अपेक्षा करू शकतो. या फोनमध्ये नवीन iOS सॉफ्टवेअर अपडेट दिले जाऊ शकते.

आयफोन लॉन्च व्हायला अजून एक महिना बाकी आहे. प्रत्येक वेळी प्रमाणे या सीरिजमध्ये चार मॉडेल्स (iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro, आणि iPhone 15 Pro Max) असतील. नवीन iPhones मध्ये USB-C पोर्ट असण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे ते iPhones साठी पहिले असेल.

iPhone 15 ची संभाव्य किंमत

मिळालेल्या माहितीनुसार, भारतात iPhone 15 ची किंमत जवळपास 80,000 रुपये असेल. ही सर्वात स्वस्त मॉडेलची किंमत असू शकते. त्याचवेळी, काही लीक्समध्ये असेही बोलले जात आहे की कंपनी Apple iPhone 15 ची किंमत वाढू शकते.

‘या’ दिवसापासून प्री-ऑर्डर सुरू होऊ शकतात 

9to5Mac च्या रिपोर्टनुसार, जर आयफोन13 सप्टेंबरला लॉन्च झाला तर कंपनी 15 सप्टेंबरपासून प्री-ऑर्डर सुरू करू शकते. कंपनी 22 सप्टेंबरपासून मोबाईल फोनची विक्री सुरू करू शकते अशी माहिती आहे. 

महत्त्वाच्या बातम्या :

Google Doodle : अल्टिना शिनासी यांच्या जयंतीनिमित्त गुगलचं खास डूडल; वाचा “कॅट-आय” फ्रेमची रंजक कहाणी

[ad_2]

Related posts