गुंतवणूकदारांच्या खात्यात सहारा रिफंडचे पैसे जमा; गृहमंत्री अमित शहांनी केले हस्तांतरित

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sahara Refund Portal: सहारा इंडियाच्या कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी (Sahara India Investors) एक दिलासादायक बातमी. वर्षानुवर्षे अडकलेले गुंतवणूकदारांचे पैसे मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यापूर्वी, गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी केंद्र सरकारनं सहारा रिफंड पोर्टल सुरू केलं होतं, ज्यावर लाखो गुंतवणूकदारांनी पैसे मिळवण्यासाठी अर्ज केले होते. शुक्रवारी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी सहारा समूहाच्या सहकारी संस्थांच्या ठेवीदारांची रक्कम सहारा रिफंड पोर्टलद्वारे हस्तांतरित केली आहे.

15 लाखांहून अधिक लोकांनी केली नोंदणी 

सहारा समूहाच्या (Sahara India) को-ऑपरेटिव्हमध्ये गुंतवणूकदारांचे अडकलेले कोट्यवधी रुपये परत करण्यासाठी केंद्र सरकारनं सेंट्रल रजिस्ट्रार ऑफ को-ऑपरेटिव्ह सोसायटी  (CRCS) पोर्टल सुरू केलं आहे. या पोर्टलद्वारे ज्या गुंतवणूक दारांच्या गुंतवणुकीची मॅच्युरिटी पूर्ण झाली आहे, त्याच गुंतवणूक दारांना पैसे परत मिळू शकणार आहेत. पहिल्या टप्प्यात 10 हजार रुपये गुंतवणूकदारांना परत केले जातील. ज्यांनी 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली आहे, त्यांना देखील फक्त 10 हजार रुपयेच परत केले जातील.

[ad_2]

Related posts