Who Is Gukesh D Indian Sensation Who Displaced Viswanathan Anand FIDE World Rankings Know Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

FIDE Ranking Gukesh D and Viswanathan Anand : भारताचा किशोरवयीन ग्रँडमास्टर गुकेश डी (Gukesh D) याने जागतिक क्रमवारी पाच वेळा वर्ल्ड चेस चॅम्पियन विश्वनाथन आनंद (Viswanathan Anand) यांना मागे टाकलं आहे. भारताचा किशोरवयीन ग्रँडमास्टर डी गुकेश याने विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत विजय मिळवत मोठी कामगिरी केली आहे. 4 ऑगस्ट रोजी विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत गुकेशने अझरबैजानच्या मिसरतदीन इस्कांद्रोव्हला पराभूत करून बाजी मारली आहे. सतरा वर्षांच्या गुकेशने दुसऱ्या फेरीच्या सामन्यात अझरबैजानच्या इसकांद्रोवचा 44 चालींमध्ये पराभव केला.

भारताला मिळाला नवा ‘बादशाह’

किशोरवयीन ग्रँडमास्टर डी गुकेशने गुरुवारी बुद्धिबळ विश्वचषकाच्या दुसऱ्या फेरीत अझरबैजानच्या मिसरतदीन इस्कांद्रोव्हचा पराभव केला. यासह, FIDE म्हणजेच Federation Internationale des Echecs च्या थेट जागतिक रेटिंगमध्ये, त्याने आपला आदर्श विश्वनाथन आनंद यांचा पराभव केला आहे. आता गुकेश विश्वनाथन आनंद यांना मागे टाकत जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर विश्वनाथन आनंद या क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर आहेत. महत्त्वाचं म्हणजे डी गुकेश विश्ननाथन आनंद यांचा शिष्य आहे. विश्ननाथन आनंद यांनी वेस्‍टब्रिज आनंद चेस ॲकेडमीमधून गुकेशला प्रशिक्षण दिलं आहे.

डी गुकेश ठरणार अव्वल भारतीय बुद्धिबळपटू

जागतिक बुद्धिबळ संघटना FIDE (वर्ल्ड चेस फेडरेशन) सप्टेंबर महिन्यात मासिक क्रमवारी जाहीर करेल तेव्हा डी गुकेश हा अव्वल भारतीय बुद्धिबळपटू असेल. 36 वर्षांनंतर पहिल्यांदा विश्वनाथन आनंद यांचं नाव भारतीय बुद्धीपटूंच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर नसेल. आता विश्वनाथन आनंद यांचं पहिलं स्थान डी गुकेशकडे जाणार आहे.

कोण आहे गुकेश डी? 

डी गुकेशचं पूर्ण नाव डोमराजू गुकेश असून तो चेन्नईचा रहिवासी आहे. गुकेशचा जन्म 7 मे 2006 रोजी चेन्नई येथे झाला. गुकेशचे वडील डॉक्टर आहेत, तर आई व्यवसायाने मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. गुकेशने वयाच्या सातव्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला प्रशिक्षक भास्कर यांनी त्याला प्रशिक्षण दिले. यानंतर विश्वनाथन आनंद यांनीच गुकेशला बुद्धिबळातील डावपेच शिकवत प्रशिक्षणही दिलं आहे.

 



[ad_2]

Related posts