Pune ATS News CCTV Footage Of Pune Police Arresting Terrorists

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune ATS, NIA Raids : पुणे पोलिसांचा दहशतवाद्यांना पकडतानाचा सीसीटीव्ही समोर (maharashtra ATS, NIA module) आला आहे. 18 जुलैच्या पहाटे कोथरूड पोलिसांनी ज्या वेळेला तीन दहशतवाद्यांना पकडले त्या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. कोथरूडमध्ये पकडलेले जे तीन दहशतवादी होते त्यांना त्यांच्या निवासस्थानी ज्यावेळी नेण्यात आले त्यावेळी त्या तिघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि त्यांच्यात झालेल्या धरपकडीचा हा व्हिडीओ आहे. 

यावेळी मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी आणि शाहनवाज हे तिघे ही पोलिसांच्या ताब्यात होते मात्र कोंढवा परिसरात शाहनवाजने पळ काढला. याच वेळी साकी हा देखील पळण्याच्या प्रयत्नात होता मात्र त्याला पोलिसांनी पकडले. सीसीटीव्हीमध्ये असणारा दहशतवादी हा मोहम्मद युनूस साकी असून कोंढवा भागात पोलिसांना गुंगारा देत पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बाला रफिक शेख या पोलिस अधिकाऱ्याने साकिला पकडून ठेवले आणि जेरबंद केलं. पुण्यातील कोंढवा परिसरात हे सगळे राहत होते. 15 महिन्यांपासून त्यांचं तिथे वास्तव्य होतं. NIA आणि ATS यांनी पकडलेले सगळे एकमेकांच्या संपर्कात असल्याचंदेखील आता समोर आलं आहे. 

18 तारखेला नेमकं काय घडलं?

कोथरुड येथे पोलीस पेट्रोलिंग पथक प्रदीप चव्हाण आणि अमोल नाझन हे पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी तीन दुचाकी चोरांना पकडले. या चोरांनी आजपर्यंत चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यासाठी या तीन आरोपींना ते राहत असलेल्या ठिकाणी नेण्यात आले. त्या वेळी तिन्ही आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न करु केला मात्र एक आरोपी पळून जण्यात सफल झाला तर दोन आरोपी इमरान शेख आणि मोहमद यूनुस साकी यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीच्या घराची झडती घेतली असता घरातून एक जिवंत काडतूस आणि चार मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. मरान शेख आणि मोहमद यूनुस साकी यांना चोरीच्या गुन्ह्यात पकडण्यात आलं होतं. संपूर्ण चौकशी केली असता. त्यांनी देशविरोधी कृत्य केल्याचं समोर आलं. त्यातच हे प्रकरण नंतर एनआयएकडे पुढील तपासासाठी देण्यात आले आणि तपासादरम्यान युनुस साकी आणि इम्रान खान या दोघांची नावं समोर आली. हे दोन्ही आरोपी एनआयएच्या याच प्रकरणात वॉन्टेड आरोपी होते. त्यांना पकडून देणाऱ्यांना NIA कडून पाच लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं. 

 

हेही वाचा-

महाराष्ट्रातून एटीएसने घातपाती कारवायांचा कट उधळला, 15 ऑगस्टला देशात घातपाताचा होता कट

 

 

 



[ad_2]

Related posts