Tilak Varma Became New Sixer King For India As Yuvraj Singh ; भारताला मिळाला नवा सिक्सर किंग, पहिल्याच चेंडूवर षटकार लगावल्यावर आली युवराजची आठवण

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

त्रिनिदाद : युवराज सिंगला भारत कधीही विसरू शकत नाही. कारण युवराजच्या जोरावर भाराने दोन विश्वचषक जिंकले होते. पण आता भारताला एक नवा सिक्सर किंग सापडला आहे. कारण पहिल्याच चेंडूवर त्याने जेव्हा षटकार झळकावला तेव्हा सर्वांनाच युवराजची आठवण आल्यावाचून राहावले नाही.

युवराज सिंग हा सिक्सर किंग म्हणून अजूनही क्रिकेट विश्वात ओळखला जातो. आतापर्यंत भारताला सिक्सर किंग मिळाला नव्हता. पण त्याचा पहिला फटका जेव्हा पाहिला तेव्हा तो षटकार होता आणि त्यावेळी सर्वांनाच युवीची आठवण आली होती. या फलंदजाला भावी युवराज असेही म्हटले जाते. आयपीएलमध्ये ज्याने धावांच्या राशी उभारल्या. सामना हातामधून जातोय असे वाटत असताना संघाने ज्याला खेळायला पाठवले आणि त्याने बऱ्याचदा संघाला विजय मिळवून दिला असा खेळाडू आहे तो म्हणजे मुंबई इंडियन्सकडून खेळणार तिलक वर्मा. मुंबई इंडियन्सकडून खेळताना तिलकने आपली स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि त्याच्याच जोरावर त्याला भारताच्या टी-२० संघात स्थान मिळाले आहे. बऱ्याच वर्षांनी भारताला मधल्या फळीत युवराजसारखा खेळणारा डावखुरा फलंदाज सापडल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे त्याला काही चाहते ज्युनिअर युवराज सिंग, असेही म्हणतात. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या चेंडूवर त्याने जो षटकार लगावलाते पाहता सर्वांनाच युवराजची आठवण आली. दुसऱ्या चेंडूंवरही तिलकने षटकार लगावला. या सामन्याच तिलकने तीन षटकार लगावले आणि या तिन्हीवेळी युवराजची आठवण आली. त्यामुळे आता भारतीय संघाला नवा युवाज सिंग सापडला आहे, अशी चर्चा सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वात सुरु झाली आहे.

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

तिलकने या सामन्यात खऱ्या अर्थाने रंगत आणली. कारण इशान किशन आणि शुभमन गिल हे दोन्ही सलामीवीर झटपट बाद झाले होते. भारताचा संघ अडचणीत होता. त्यावेळी तिलक फलंदाजीला आला आणि त्याने भारताला विजयाचे स्वप्न दाखवले. पण हे विजयाचे स्वप्न त्याला सत्यात उतरवता आले नाही, हे मात्र तेवढेच खरे आहे.

[ad_2]

Related posts