Rain News Heavy Rains In Bhandara District, All 33 Gates Of Gosikhurd Dam Opened

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bhandara : सध्या राज्यात पावासाचा जोर कमी झाला असला तरी काही भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. भंडारा (Bhandara) जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं नदी नाले दुथडी भरुन हात आहेत. नदी, नाले आणि धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे. जोरदार पावसामुळं  गोसीखुर्द धरणाच्या पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. त्यामुळं गोसीखुर्द धरणाचे सर्वच्या सर्व 33 गेट उघडले आहेत. सध्या धरणातून 131320 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. 

भंडारा जिल्ह्यासह गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील तीन ते चार दिवसात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळं गोसीखुर्द धरणाच्या जलसाठ्यातही वाढ होत आहे. परिणामी गोसीखुर्द धरणाची पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी रात्री 8 वाजता सर्वच्या सर्व 33 गेट अर्धा मीटरनं उघडले आहेत. त्यातून 1 लाख 31 हजार 320 पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सकाळपासून गोसीखुर्द धरण प्रशासनानं गेटची संख्या टप्प्याटप्प्यानं वाढवली. गोसीखुर्द धरणातून विसर्ग करण्यात येणाऱ्या पाण्याचा फटका चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना बसतो. या पावसाळ्यात गोसीखुर्द धरणाची सर्व गेट उघडण्याची ही तिसरी वेळ आहे. नदी काठांवरील नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन धरण प्रशासनानं केलं आहे.

वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ 

मागील तीन ते चार दिवसापासून भंडारा जिल्ह्यात पावसानं दडी मारली होती. त्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. रात्रीपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. गेल्या काही दिवसात जिह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली होती. त्यामुळं वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती. परिणामी गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 गेट उघडण्यात आली आहेत. पाऊस कमी झाल्यानं  गेट बंद करुन केवळ दोन गेटमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. मात्र, मागील तीन ते चार दिवसापासून सुरु झालेल्या या पावसामुळं नदी नाले पुन्हा एकदा दुथडी भरून वाहू लागलेले आहेत.

धापेवाडा बॅरेजचा विसर्ग वाढवला

संजय सरोवरचे पाच गेट उघडले आहेत. त्यातूनही 22 हजार 515 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. संजय सरोवरचं पाणी भंडारा इथं पोहचायला 45 तासांचा कालावधी लागतो.

गोसीखुर्द धरण अपडेट

सकाळी 9 -15 गेट – विसर्ग 62,935 क्युसेक
सकाळी 11- 23 गेट – विसर्ग 93,457 क्युसेक
दुपारी 1 – 27 गेट – विसर्ग 1,08,619 क्युसेक
रात्री 8 – 33 गेट – विसर्ग 1,31,320 क्युसेक

महत्त्वाच्या बातम्या:

Bhandara: मामा तलावाच्या बॅक वॉटरमुळं 25 एकर शेती पाण्याखाली, शेतकऱ्यांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा 

[ad_2]

Related posts