Jalgaon Chakkajam Protest Against Oppression Of Women And Equal Civil Law In Jalgaon Many Places Are Strictly Closed

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Jalgaon: महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना तसेच समान नागरी कायद्याला विरोध म्हणून जळगाव (Jalgaon) शहरातील आकाशवाणी चौकात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आणि भारत मुक्ती मोर्चा यांच्यातर्फे सोमवारी (7 ऑगस्ट) रास्ता रोको (Rasta Roko) आंदोलन करण्यात आलं. भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने देशव्यापी भारत बंद आंदोलनाची हाक देखील देण्यात आली होती.

महिला अत्याचारांवर केंद्राकडून बघ्याची भूमिका

देशभरात महिलांवर अत्याचार वाढले आहेत, असं असताना केंद्र सरकार मात्र बघायची भूमिका घेत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. आता निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्यामुळे सत्ताधारी भाजपशासित केंद्र सरकारकडे कोणत्याही स्वरूपाचा अजेंडा नसल्याने समान नागरी कायद्याचा मुद्दा पुढे करण्यात आल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. या आंदोलनात महिलावर्गाची संख्या लक्षणीय होती. देशभरातील महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी कडक कायदे करावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.ट

गोंडगावमधील महिला अत्याचाराच्या घटनेनंतर बंदची हाक

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात असलेल्या गोंड गाव येथे आठ वर्षीय मुलीवर गावातीलच एका नराधमाने अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आणि यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ दोन दिवसांआधीही सर्वपक्षियांच्या वतीने कडकडीत भडगाव बंद  पाळण्यात आला होता. सोमवारी (7 ऑगस्ट) पुन्हा पाचोरा तालुक्यात बंदचं आवाहन करण्यात आलं असून यामध्ये सर्वपक्षीयांसह विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या असल्याचं पाहायला मिळालं आहे.

बंदला नागरिकांचा प्रतिसाद

राजकारणात एरवी एकमेकांविरोधात टीका-टिपण्णी करणारे सर्वपक्षीय नेते आता मात्र गोंडगाव घटनेच्या निषेधार्थ एक झाल्याचं पाचोरा येथे पाहायला मिळालं. महिला अत्याचाराविरोधात जमलेल्या नेत्यांनी या घटनांवर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. गोंडगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेनंतर जनतेतून या घटनेचा काही केल्या कमी होताना दिसत नाही. या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने दिलेल्या बंदच्या आवाहनाला जनतेतून मोठा प्रतिसाद मिळाला.

सर्वपक्षीय नेते महिला अत्याचाराविरोधात एकवटले

सत्ताधारी पक्षाचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी म्हटलं आहे की, महिला अत्याचाराच्या घटना अतिशय क्रूरपणाच्या आहेत. या घटनांचा निषेध करावा तेवढा कमी आहे, या घटनेत आरोपीने.केलेलं घृणास्पद कृत्य पाहता त्याला फाशीची शिक्षा व्हावी, त्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या जाणार असल्या तरी अशा प्रकारचे मानवतेला काळीमा फासणाऱ्या आरोपीचे वकील पत्र कोणीही घेऊ नये, असं आवाहनही किशोर पाटील यांनी केलं आहे.

आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी

ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनीही या घटनांचा निषेध केला असून आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असं त्या म्हणाल्या. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला मारुन टाकल्याची ही घटना पाहता मुलांवर संस्कार कमी होत असल्याचं त्या म्हणाल्या. पालकांनी मुलांकडे जातीने लक्ष घालून त्यांना चांगले संस्कार देऊन त्यांना चांगला माणूस बनवलं पाहिजे, जेणे करून अशा घटना टाळता येईल, असंही वैशाली सूर्यवंशी यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा:

Jalgaon Crime : पीडितेच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात, संशयिताला कठोर शिक्षेच्या मागणीसाठी भडगाव बंद 

[ad_2]

Related posts