Team India: सचिन, धोनी की विराट ? भारताचा सर्वात श्रीमंत क्रिकेटर कोण ?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
Richest Indian Cricketer:  सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि विराट कोहली यांचा समावेश भारताच्या दिग्गज खेळाडूमध्ये होतो. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणला जातो. सचिन तेंडुलकरने आपल्या जवळपास 25 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले. त्याशिवाय महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाने एकदिवसीय आणि T20 विश्वचषक तसेच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. धोनीने 2019 मध्ये क्रिकेटला अलविदा केला होता. धोनीनंतर विराट कोहलीने भारतीय संघाच धुरा सांभाळली होती. विराट कोहलीने आतापर्यंत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. धोनी, सचिन आणि विराट हे खेळाडू क्रिकेटशिवाय इतर ठिकाणावरुनही कमाई करतात.

आज आपण सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांची एकूण संपत्ती आणि कमाई किती? याबाबत पाहणार आहोत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती 1250 कोटी रुपये इतकी आहे. भारतीय संघाव्यतिरिक्त सचिन तेंडुलकर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. याशिवाय सचिन तेंडुलकर अनेक जाहिरातींशी संबंधित आहे. अद्यापही सचिन तेंडुलकर अनेक जाहिराती करतो. दुसरीकडे, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची एकूण संपत्ती 1040 कोटींच्या आसपास आहे. अशाप्रकारे, कॅप्टन कूलची एकूण संपत्ती मास्टर ब्लास्टरपेक्षा कमी आहे. धोनीपेक्षा विराट कोहलीची संपत्ती जास्त असल्याचे अनेक रिपोर्टसमधून समोर आलेय.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीची एकूण संपत्ती 1050 कोटींच्या आसपास आहे. भारतीय संघाव्यतिरिक्त विराट कोहली आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु म्हणजेच आरसीबी संघाकडून खेळतो. तसेच विराट कोहली जाहिरातींमधून करोडो रुपये कमावतो. इतकेच नाही तर विराट कोहली सोशल मीडिया पोस्टमधून करोडो रुपये कमावतो. इंस्टाग्रामवर एका पोस्टसाठी विराट कोहली आठ ते नऊ कोटी रुपये घेतो, असे म्हटले जाते. तर विराट कोहली फेसबुकवर एका पोस्टसाठी अडीच कोटी रुपये घेतो. सचिन तेंडुलकर भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर आहे, त्यानंतर विराट कोहली आणि धोनी यांचा नंबर लागतो.

विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि एमएस धोनी हे सर्वकालीन तीन महान क्रिकेटपटू 2011 च्या विश्वचषकात एकत्र खेळले आहेत. 2011 चा विश्वचषक भारतीय संघाने जिंकला होता. यामध्ये या तिन्ही खेळाडूंचा मोठा वाटा होता. आता भारतामध्येच विश्वचषक होत आहे, 2011 च्या विश्वचषकातील फक्त विराट कोहली या संघाचा भाग आहे. विराट कोहलीचा हा अखेरचा विश्वचषक असू शकतो. भारतीय संघ यंदाच्या विश्वचषकात कशी कामगिरी करतो, याकडे चाहत्यांचे लक्ष्य लागलेय. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होत आहे. भारताचा पहिला सामना आठ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

[ad_2]

Related posts