ODI World Cup 2023 Likly India Name This 15-man Squad For World Cup 2022

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ODI World Cup 2023 : भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाला काही दिवस शिल्लक आहेत. प्रत्येक संघाने संघबांधणीसाठी सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाने आज विश्वचषकासाठी 18 जणांच्या चमुची निवड केली. त्यानंतर भारतीय संघात कोण कोणते शिलेदार असतील, याबाबत चाहत्यांच्या मनात प्रश्नाचं काहूर माजले असेल.. याचेच उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करुयात…

विश्वचषक भारतात होणार आहे, त्यामुळे टीम इंडियाला विजेतेपदाचा दावेदार म्हटले जातेय. पण भारतीय संघ खरेच तयार आहे का ? विश्वचषक खेळणारे 15 खेळाडू कोणते असतील ? हे पाहूयात… 

सुरुवात टॉप ऑर्डरपासून करुयात… 

शुभमन गिल आणि कर्णधार रोहित शर्मा सलामीला असतील, यात शंकाच नाही. तिसरा सलामी फलंदाज ईशान किशन असेल. कारण, गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाने ईशान किशन याच्यावर गुंतवणूक केली आहे. त्याला वारंवार संधी दिली, त्याने त्याचे सोनेही केले. त्यामुळे भारताचा तिसरा सलामी फलंदाज ईशान किशन असेल. ईशान किशन सलामीशिवाय पर्यायी विकेटकिपर म्हणूनही भूमिका बजावेल. तिसऱ्या क्रमांकावर रनमशीन विराट कोहली खेळेल, यात शंकाच नाही… 

रोहित शर्मा, शुभमन गिल/ईशान किशन आणि विराट कोहली…. ही झाली आघाडीची फळी….

पण भारतीय संघाचा खरा प्रॉब्लेम चौथ्या क्रमांकाचा आहे. या स्थानावर कोण खेळणार? 

केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे दुखापतग्रस्त आहेत. दोघांनी दुखापतीवर मात केली की नाही, याबाबत अपडेट आलेली नाही. पण हे दोन्ही फलंदाज नसतील तर काय?  संजू सॅमसन आणि हार्दिक पांड्या त्यांची कमी भरुन काढणार का? केएल राहुलने विकेटकीपिंग आणि फलंदाजीचा सराव सुरु केलाय. तो लवकरच भारतीय संघात पदार्पण करेल, अशी आशा आहे. राहुल भारतीय संघात फर्स्ट चॉईस विकेटकिपर आहे. राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल. राहुल आणि हार्दिक पांड्या हे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरतील.. राहुल अनफीट असेल तर संजू सॅमसन याला संधी मिळेल. श्रेयस अय्यर याच्याबाबतही संभ्रम कायम आहे. श्रेयस अय्यरने याने पुनरागमन केले तर तो चौथ्या क्रमांकावर उतरेल. म्हणजे काय… तर केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या उपलब्धतेनंतरच संजू सॅमसन याच्याबाबत निर्णय घेतला जाईल. श्रेयस अय्यर उपलब्ध नसेल तरच सूर्याला संधी मिळेल. सहाव्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव फलंदाजीला उतरेल. वेस्ट इंडिज दौऱ्यावर टीम इंडियाने सूर्यकुमार यादवला फिनिशर म्हणून खेळवले होते. वनडेमध्ये टी20 टच देण्यासाठी सूर्याचा वापर केला जातोय. अखेरच्या पाच-दहा षटकांत सूर्या चांगली फलंदाजी करु शकतो. सातव्या क्रमांकावर रविंद्र जाडेजा असेल.  

केएल राहुल/ संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव/ सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेज

आता गोलंदाजीकडे वळूयात…

भारतात सामने होणार आहेत, त्यामुळे फिरकीपटूंची भूमिका मोठी होते. भारत कमीतकमी दोन फिरकी गोलंदाज उतरणार, यात शंका नाही. यामध्ये रविंद्र जाडेजा याचं नाव फिक्स आहे. कुलदीप यादव याच्यावर टीम मॅनेजमेंटने विश्वास दाखवलाय. त्यामुळे आठव्या क्रमांकावर कुलदीप यादव असेल. भारतीय संघाचे तीन आघाडीचे वेगवान गोलंदाज जवळपास फिक्स आहेत. जसप्रीत बुमराह याने दुखापतीनंतर पुनरागमन केलेय. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज…… हे तीन वेगवान गोलंदाज असतील. 

कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह… 

आतापर्यंत आपण 12 खेळाडू पाहिले… तीन खेळाडू कोणते असतील, त्याबाबत पाहूयात..

अक्षर पटेल यालाही अंतिम 15 मध्ये स्थान दिले जाऊ शकते. रविंद्र जाडेजाची तो लाईक टू लाईट रिप्लेसमेंट आहे. त्याशिवाय युजवेंद्र चहल आणि शार्दुल ठाकूर हे दोन खेळाडू असतील. शार्दूल ठाकूर याने मागील तीन वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याशिवाय तो तळाला फलंदाजीही करु शकतो. टीम मॅनेजमेंट आऊटऑफ द बॉक्स आर. अश्विन याचाही विचार करु शकते. पण, अश्विनला संधी दिल्यास चहल याचा पत्ता कट होऊ शकतो… तसेच शार्दूल ठाकूर आणि जयदेव उनादकड यांच्यामध्ये स्पर्धा होईल.

कोणते 15 शिलेदार असू शकतात त्याबाबत पाहूयात…

रोहित शर्मा  (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, संजू सॅमसन/केएल राहुल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव/श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल/आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर

[ad_2]

Related posts