Veterinary Council Of India Veterinary Council Of India  registration Of 81 Thousand 938 Veterinary Doctors Across The Country Says Parshottam Rupala

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

 Parshottam Rupala : भारतीय पशुवैद्यकीय परिषदेनं (Veterinary Council of India) संकलित केलेल्या माहितीनुसार देशभरात 81 हजार 938 पशुवैद्यकीय डॉक्टरांची नोंदणी झाली आहे. तर महाराष्ट्रात 10 हजार 570 नोंदणीकृत पशुवैद्यकीय डॉक्टर (veterinary doctors) आहेत. 31 मार्च 2023 पर्यंत नोंदणी झालेल्यांची ही माहिती आहे. केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री पुरुषोत्तम रुपाला (Minister Parshottam Rupala) यांनी लोकसभेत खासदार प्रीतम मुंढे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली. काही राज्यांमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरांची अजिबात कमतरता नसल्याचे रुपाला म्हणाले.  यावेळी रुपाला यांनी देशभरातील पशुवैद्यकीय डॉक्टरांची राज्यनिहाय आकडेवारी सांगितली. 

पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात सर्वात जास्त नोंदणीकृत पशुवैद्यकीय डॉक्टरांची संख्या ही महाराष्ट्रात आहे. राज्यात 10 हजार 570 नोंदणीकृत पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. त्याखालोखाल उत्तर प्रदेश 6 हजार 907, तामिळनाडूमध्ये 6 हजार 245 आंध्र प्रदेशात 5 हजार 324, केरळमध्ये 5 हजार 172, कर्नाटकमध्ये 4 हजार 786, गुजरातमध्ये 4 हजार 417 नोंदणीकृत पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत.

शैक्षणिकगुणवत्तेसाठी खासगी महाविद्यालयांवर देखील नियंत्रण

पशुसंवर्धन हा राज्यांच्या अधिकारक्षेत्रातील विषय आहे. सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची भरती राज्यांकडून आजाराच्या महामारी विज्ञानाच्या स्थितीनुसार आणि प्राण्यांच्या परिस्थितीनुसार निर्माण होणाऱ्या गरजांच्या आधारे केली जाते. राज्याकंडून मिळालेल्या माहितीनुसार काही राज्यांमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या तुटवड्याचे प्रमाण बदलत आहे. तर काही राज्यांमध्ये कोणताही तुटवडा नाही. पशुवैद्यकीय रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात डॉक्टर उपलब्ध करण्यासाठी उपाययोजना करण्याचे राज्यांना अधिकार आहेत. राज्य सरकारांनी, राज्य विद्यापीठांनी सुरू केलेल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयांना, पशुवैद्यकीय शिक्षणामध्ये उच्च गुणवत्ता टिकवण्याच्या उद्देशाने  केंद्र सरकारकडून भारतीय पशुवैद्यकीय परिषदेने केलेल्या शिफारशींच्या आणि नियमांच्या आधारे मान्यता दिली जाते. तसेच भारतीय पशुवैद्यकीय परिषदेकडून शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी खासगी महाविद्यालयांवर देखील नियंत्रण ठेवले जाते.

पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग

पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग ( DAHD) हा भारत सरकारचा विभाग आहे. हे पशुधनाचे उत्पादन, त्यांचा साठा सुधारण्यासाठी तसेच देशातील डेअरी पायाभूत सुविधांच्या विकासाशी संबंधित बाबींसाठी जबाबदार आहे. दुग्धव्यवसाय क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी पशुधनांना आरोग्य सेवा आणि इतर सेवा प्रदान करणे देखील बंधनकारक आहे. 1919-20 पासून भारतामध्ये वेळोवेळी पशुधनाची गणना केली जाते. ज्यामध्ये सर्व पाळीव प्राणी आणि त्यांची संख्या समाविष्ट असते.  पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने पशुगणना अहवाल प्रसिद्ध करण्याची जबाबदारी घेतली आहे. ज्यामध्ये सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा सहभाग आहे. विभागाने जाहीर केलेल्या 20 व्या पशुधन गणनेच्या अहवालानुसार, भारतातील एकूण पशुधन लोकसंख्या 535.78 दशलक्ष असल्याचे आढळून आले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Animal Husbandry : पावसाळा आणि साथरोगाच्या काळात जनावरांची तपासणी करुन लसीकरण करा, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. मुकणे यांचं आवाहन 

[ad_2]

Related posts