Pakistan Squad For Asia Cup 2023 Pakistan Announce Squads For Asia Cup And Afghanistan Series

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pakistan squad for Asia Cup : आशिया चषकासाठी पाकिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे.  बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तान संघ मैदानात उतरणार आहे. पाकिस्तान संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. आशिया चषकाची सुरुवात 30 ऑगस्टपासून होणार आहे. पाकिस्तानचा सामना सलामीला नेपाळविरोधात होणार आहे. त्यानंतर दोन सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशिया चषक आणि आफगाणिस्तान दौऱ्यासाठी संघाची निवड केली आहे. या संघात काही युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. 

आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ 

अब्दुल्लाह शफीक, फखर जमान, इमाम उल-हक, बाबर आजम (कप्तान), सलमान आघा, टी. ताहीर, साऊद शकील, मोहम्मद रिजवान, मोहम्मद हारिस, फहीम अशरफ, हारिस राउफ, मोहम्मद वसीम जूनियर, नादिर शाह, शाहीन आफ्रिदी.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सप्टेंबरला लढत…

आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. हा पाकिस्तानचा दुसरा तर भारताचा पहिला सामना असेल. आशिया चषकातील भारताचे सर्व सामने श्रीलंकामध्ये होणार आहे. एकूण 13 सामन्यापैकी 9 सामने श्रीलंकामध्ये तर 4 सामने पाकिस्तानात होणार आहेत. 17 सप्टेंबर रोजी फायनलची लढत होणार आहे. 

30 ऑगस्ट 2023 ते 17 सप्टेंबर 2023 या दरम्यान आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्थान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. 13 एकदिवसीय सामन्यानंतर आशियाचा किंग कोण ? यावरुन पडदा उठणार आहे. 

















तारीख फेरी सामना ठिकाण कधी होणार सामना
30 ऑगस्ट 2023 1 पाकिस्तान vs नेपाळ मुल्तान, पाकिस्तान दुपारी 3 वाजता
31 ऑगस्ट 2023 1 बांगलादेश vs श्रीलंका कँडी, श्रीलंका दुपारी 3 वाजता
2 सप्टेंबर 2023 1 पाकिस्तान vs भारत कँडी, श्रीलंका दुपारी 3 वाजता
3 सप्टेंबर 2023 1 बांगलादेश vs अफगाणिस्तान  लाहोर, पाकिस्तान दुपारी 3 वाजता
4 सप्टेंबर 2023 1 भारत vs नेपाळ  कँडी, श्रीलंका दुपारी 3 वाजता
5 सप्टेंबर 2023 1 श्रीलंका vs अफगाणिस्तान लाहोर, पाकिस्तान दुपारी 3 वाजता
6 सप्टेंबर 2023 2 (सुपर – 4) A1 vs B2 लाहोर, पाकिस्तान दुपारी 3 वाजता
9 सप्टेंबर 2023 2 (सुपर – 4) B1 vs B2 कँडी, श्रीलंका दुपारी 3 वाजता
10 सप्टेंबर 2023 2 (सुपर – 4) A1 vs A2 कँडी, श्रीलंका दुपारी 3 वाजता
12 सप्टेंबर 2023 2 (सुपर – 4) A2 vs B2 दांबुला, श्रीलंका दुपारी 3 वाजता
14 सप्टेंबर 2023 2 (सुपर – 4) A1 vs B1  दांबुला, श्रीलंका दुपारी 3 वाजता
15 सप्टेंबर 2023 2 (सुपर – 4) A2 vs B2 दांबुला, श्रीलंका दुपारी 3 वाजता
17 सप्टेंबर 2023  फायनल S4 1 vs S4 2 कोलंबो, श्रीलंका दुपारी 3 वाजता

 कुठे पाहाता येणार सामने?

31 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकामध्ये आशिया चषक रंगणार आहे. भारतीय चाहत्यांसाठी आशिया चषकाचे लाईव्ह स्ट्रिमिंग हॉटस्टारवर पाहाता येईल. त्याशिवाय स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह सामने पाहाता येणार आहेत. त्याशिवाय एबीपी माझ्याच्या संकेतस्थळावरही आशिया चषकासंदर्भातील अपडेट तुम्हाला पाहाता येतील. आशिया चषकासाठी हायब्रिड मॉडेल वापरण्यात आलेय. पाकिस्तानमध्ये चार सामने होणार आहेत. तर उर्वरित सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. हायब्रिड मॉडेलचा स्विकार केल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये जाणार नाही? हे स्पष्ट झालेय. टीम इंडियाचे सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. बुधवारी आशिया चषक वेळापत्रकाची घोषणा होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरारक सामना श्रीलंकामध्ये होणार आहे. 



[ad_2]

Related posts