[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Dombivli Crime: पैशांच्या उसनवारीच्या वादातून एकाने नातेवाईक महिलेच्या डोक्यात हातोडी मारून आणि मानेवर इंजेक्शन टोचून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. डोंबिवली पुर्वेतून ही खळबळजनक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून याप्रकरणी डोंबिवली पूर्वेतील टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. राजीव भुयान असं गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोराचं नाव आहे, तर ममताराणी सुभाष पात्रा असं जखमी महिलेचं नाव आहे.
ममताराणी ही महिला तिचा पती सुभाषसह डोंबिवली पुर्वेकडील गोग्रासवाडी भागात असलेल्या साईश इनक्लेव्ह इमारतीत राहते. तर आरोपी राजीव हा जखमी महिलेचा मामेभाऊ असून दोघंही मूळचे ओरिसा राज्यातील रहिवासी आहेत. आरोपी राजीव हा एका खासगी कंपनीत कामाला असून तो घटनेच्या पूर्वी ममताराणी हिच्या घरी राहण्यास होता. तर महिलेचा पती हा कल्याण-डोंबिवली महापालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. त्यातच काही महिन्यांपूर्वी जखमी ममताराणी हिच्या पतीने आरोपी राजीवकडून उसने पैसे घेतले होते. तेच पैसे परत मागण्याचा तगादा आरोपीने नातेवाईक सुभाषकडे लावला होता. मात्र त्यांच्यात वाद होऊन सुभाषने आरोपीला घराबाहेर काढले, तेव्हापासून आरोपी हा अंबिका नगरमध्ये वेगळा राहत आहे.
दरम्यान, उसने दिलेले पैसे मागण्यासाठी आरोपी हा 8 ऑगस्टला सकाळी साडेअकरा वाजता सुभाषच्या घरी दारू पिऊन गेला होता. त्यावेळी सुभाष कामावर गेल्याने त्याची पत्नी ममताराणी ही घरात होती. त्यामुळे आरोपीने तिच्याकडे उसने पैसे मागण्यासाठी तगादा लावला. त्यावर, सध्या माझे पती घरी नाही, आल्यनंतर तुझे उसने घेतलेले पैसे ते देतील, असं ममताराणीने आरोपीला संगितलं. मात्र आरोपी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्याने उसनवारीच्या पैशांवरुन वाद घालत शिवीगाळ केली. यानंतर वाद आणखी चिघळला आणि दोघांमध्ये मारामारी झाली. मारामारी सुरु असतानाच आरोपीने बॅगमधून हातोडी काढून ममताराणीच्या डोक्यात मारली. शिवाय तिला भीती दाखवण्यासाठी तिच्या मानेत इंजेक्शन टोचून घटनास्थळावरुन आरोपी पळून गेला.
दुसरीकडे शेजाऱ्यांनी ममताराणी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. उपचार करून घरी आल्यानंतर 9 ऑगस्ट रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास आरोपी राजीव विरोधात टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी विविध कलमांनुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करत आहेत.
हेही वाचा:
Dombivli: रेकी करुन घरफोड्या करणारे दोन सराईत चोर अटकेत; चोरीच्या पैशांतून बारबालांवर करायचे उधळपट्टी
[ad_2]