Guru Gochar will make these signs rich till 2024 Support will give luck

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Guru Gochar 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये गुरु हा सर्वात मोठा ग्रह मानला जातो. शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनुसार, त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये गुरु 1 ते 1.5 वर्षांनी आपल्या राशीमध्ये बदल करतो. यंदाच्या वर्षी गुरु ग्रहाने गोचर केलंय. ज्यामुळे काही राशीच्या व्यक्तींना याचा फायदा होताना दिसतोय.

गुरू ग्रहाने मार्च 2023 मध्ये मेष राशीत प्रवेश केला आहे. तर 2024 पर्यंत गुरु मेष राशीत भ्रमण करणार आहे. गुरुच्या या गोचरचा परिणाम सर्व राशीच्या व्यक्तींवर होताना दिसतो. दरम्यान गुरुचं हे गोचर काही राशीच्या लोकांसाठी फायद्याचं आणि लाभदायक ठरताना दिसतंय. 2024 पर्यंत गुरूचं गोचर कोणत्या राशीच्या व्यक्तींना फायदेशीर ठरू शकतं ते पाहुया.

कर्क रास

2024 पर्यंत गुरूचे गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. यावेळी तुम्हाला क्षेत्रात चांगले यश मिळू शकतात. नोकरदार लोकांना या काळात बढती मिळू शकते. बेरोजगार लोकांना या काळात नोकरी मिळू शकते. राजकारणाशी संबंधित असलेल्यांसाठी शुभ संकेत मिळत आहेत. व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. बॉस तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुम्हाला सन्मान मिळेल. 

धनु रास 

मेष राशीतील गुरुचे संक्रमण धनु राशीच्या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. कारण गुरु हा तुमच्या राशीचा स्वामी आहे. या काळात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. कौटुंबिक आनंदावर सकारात्मक प्रभाव पडेल. यासोबतच मुलांची प्रगती होऊ शकते. अनेक उत्तम संधी मिळतील. पैशाच्या बाबतीत फायदा होईल आणि सुख-समृद्धी वाढेल. कौटुंबिक सदस्यांमधील जुने वाद मिटतील.

सिंह रास 

सिंह राशीतील गुरूचं गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. यावेळी तुम्ही भाग्यवान होऊ शकता. या काळात तुम्हाला प्रसिद्धी आणि भाग्य मिळेल.  कोणत्याही व्यवसायात असाल तरी तुमची आर्थिक प्रगती होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या करिअरबाबत नियोजन कराल त्यात नशीब तुम्हाला साथ देईल. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. नोकरीच्या ठिकाणी सर्व गोष्टी तुमच्या मनाजोग्या होणार आहेत.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts