Budh Vakri 2023 retrograde of Mercury there will be a storm of these zodiac signs be careful

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Budh Vakri : ज्योतिष शास्त्रामध्ये, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. यामध्ये ग्रहांची वक्री गती अत्यंत महत्वाची मानली जाते. ऑगस्टच्या अखेरीस बुध सिंह राशीत वक्री होणार आहे. दरम्यान बुधाच्या वक्री चालीचा सर्व राशीच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. मात्र यामध्ये काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर वाईट परिणाम दिसून येणार आहे. 

कधी चालणार बुध ग्रह वक्री चाल?

24 ऑगस्ट रोजी बुध सिंह राशीत वक्री चाल चालणार आहे. बुध ग्रह सिंह राशीमध्ये 16 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तींना बुधाच्या वक्री चालीमुळे अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

मेष रास

बुध मेष राशीच्या लोकांच्या जीवनात अडचणी आणणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. याशिवाय तुमची आर्थिक स्थितीही बिघडेल. मेष राशीच्या महिलांना आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. बुध वक्री असल्याने तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुमचे पैसे अडकू शकतात. विद्यार्थ्यांना परिक्षांमध्ये मोठी अडचण येऊ शकते. तुमच्या प्रेम जीवनातही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. 

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांना बुधाच्या वक्रीमुळे अशुभ परिणाम मिळणार आहेत. या काळात तुमचं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आर्थिक समस्याही उद्भवू शकतात. घरगुती जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. बुधाची ही स्थिती तुमचा खर्च वाढवू शकते. कुटुंबातील कोणाशी मोठा वाद होऊ शकतो. तुमच्या बोलण्यात कठोरपणा देखील येणार आहे. कुटुंबातील कोणत्याही आजारावर पैसे खर्च होऊ शकतात.

सिंह रास

बुधाच्या वक्रीमुळे सिंह राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान होऊ शकते. प्रत्येक क्षेत्रात काळजी घ्यावी लागणार आहे. जोपर्यंत तुम्हाला कर्ज घेण्यास भाग पाडले जात नाही तोपर्यंत तुमचे खर्च अनावश्यकपणे वाढू शकतात. पगारातील विलंबासारख्या समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. या काळात तुम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करणं टाळावं. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुम्ही विनाकारण अडचणीत सापडू शकता. कोणत्याही प्रकारचा गैरसमज टाळा. कुटुंब आणि मित्रांसोबतचे तुमचे संबंध बिघडू शकतात. 

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts