Samudra Shastra Fluttering trembling of these parts of the body give auspicious or inauspicious signs

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Samudra Shastra : ज्योतिष्य शास्त्राप्रमाणे समुद्र शास्त्राचा ( Samudra Shastra ) अभ्यास देखील महत्त्वाचा मानला जातो. एखाद्या व्यक्तीचा चेहरा वाचणं आणि संपूर्ण शरीराचे विश्लेषण करणं हे समुद्र शास्त्राशी संबंधित आहे. समुद्र शास्त्रात ( Samudra Shastra ) असंही सांगण्यात आलंय की, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीराचा अवयव फडफडण्याचा अर्थ शुभ मानला जातो. 

अनेकदा डोळा फडफडण्याचा अशुभ मानलं जातं. मात्र हे खरंच असं असतं का? काहीवेळा अचानक डोळे किंवा बोटे सारखे शरीराचे काही भाग फडफडू लागतात. मात्र शरीरात होणाऱ्या या बदलांचा अर्थ आपल्याला कळत नाही. शरीराच्या वेगवेगळ्या भागांच्या स्पंदनाचा विशेष अर्थ असल्याचे समुद्र शास्त्रात सांगण्यात आला आहे. 

समुद्रशास्त्रानुसार, शरीराच्या अवयवांची रचना व्यक्तिमत्त्वाबद्दल माहिती देऊ शकते. समुद्रशास्त्रानुसार, शरीराच्या वेगवेगळ्या भागांना फडफडण्याचा अर्थ काय आहे ते जाणून घेऊया.

पाय थरथरणे

अनेकदा आपले पाय अचानक थरथरू लागतात. समुद्र शास्त्रानुसार ( Samudra Shastra ) , उजव्या पायाचं थरथरणं सूचित करते की, तुम्ही एखाद्या मोठ्या प्रवासाला जाऊ शकता. मात्र जर उलट दुसरा थरथरतं असेल तर ते शुभ मानलं जात नाही. अशावेळी हे तुमचं आर्थिक नुकसान होण्याचे संकेत असतात.

बोटं थरथरणं

समुद्र शास्त्रानुसार ( Samudra Shastra ) , जर तुमच्या उजव्या हाताची बोटे थरथरत असतील तर ते शुभ लक्षण मानलं जातं. याचा अर्थ असा असतो की, आपण एखाद्या नवीन व्यक्तीला भेटणार आहात. याशिवाय तुम्ही काहीतरी नवीन सुरू करणार असल्याचे हे संकेत आहेत. डाव्या हाताची बोटं थरथरणं अशुभ लक्षण मानले जाते.

कोणत्या डोळ्याचं फडफडणं असतं शुभं?

अनेकदा आपला एखादा डोळा फडफडतो. डोळा फडफडणं म्हटलं की, अनेकांना चिंता वाटू लागते. मात्र ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. समुद्र शास्त्रानुसार ( Samudra Shastra ), याचा महिला आणि पुरुषांमध्ये भिन्न अर्थ आहे. पुरूषांसाठी उजव्या डोळ्याचं फडफडणं हे शुभ लक्षण मानलं जातं. तर महिलांसाठी डाव्या डोळ्याचं फडफडणं एक शुभ चिन्ह मानले जाते.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती समुद्र शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts