[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
शेतकरी असलेल्या दुलाराम यांनी सांगितलं की, खूप वर्षांपूर्वी मी एक गाय पाळली होती. कालांतराने त्या गायीला वासरू झाले. आणि या वासराला गोठ्यातून काही चोर चोरी करून घेऊन गेले. या गायीला मी माझ्या मुलींसारखा जीव लावला. मला तीन मुली असून त्या तीनही मुलींची लग्नं झाली आहेत. त्यामुळे सध्या घरी मी आणि पत्नी असे दोघेच असतो. त्यामुळे गायीला आणि तिच्या वासराला आम्ही आमच्या कुटुंबाचाच भाग मानतो. ११ फेब्रुवारी २०२१ रोजी हे वासरू गोठ्यातून चोरून नेण्यात आले. यावेळी मला मारहाणही केली गेली असे दुलाराम यांनी सांगितले.
पोलिसांकडे गेलो की शिव्या देऊन हाकलायचे
दुलाराम यांनी सांगितले की, या प्रकरणाची तक्रार घेऊन १४ डिसेंबर २०२१ रोजी मी सरदारशहर पोलीस स्टेशन गाठले. मात्र, पोलिसांनी माझ्याकडे दुर्लक्ष केले तसेच माझी तक्रार देखील नोंदवली नाही. दरम्यान, त्यांनी पुन्हा तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलीस त्यांना अपशब्द वापरून हाकलून देत, या नंतरही त्यांनी हिंमत न हारता आपल्या गायीचा शोध सुरूच ठेवला. त्याचदरम्यान दुलाराम यांच्या गावात ३० नोव्हेंबर २०२२ रोजी एका सभेनिमित्त मुख्यमंत्री अशोक गेहलोत येणार होते. या दौऱ्यावेळी दुलाराम यांनी टॉवरवर चढत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. पोलिसांनी दुलाराम यांची भेट घेऊन गायीची डीएनए चाचणी करण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणाचा तपास डीएसपी ओमप्रकाश गोदरा यांच्याकडे सोपविण्यात आला.
गायीच्या टेस्टनंतर उलगडा
या दरम्यान, डीएसपी ओमप्रकाश गोदरा यांच्या निर्देशानुसार दुलाराम यांच्याजवळ असलेली गाय आणि चोरी झालेले वासरू यांचे सॅम्पल डीएनए चाचणीसाठी हैदराबाद येथे पाठवले. या चाचणीचा निकाल ५ महिन्यानंतर आला त्यानंतर पोलिसांनी सरदारशहर येथील गंगाराम प्रजापत याच्याकडून वासरू ताब्यात घेतले. आता हे वासरू मोठे झाले असून या गायीला दोन वासरे आहेत. आपली गाय मिळताच दुलाराम यांना अश्रू अनावर झाले होते. जोपर्यंत गाय मिळणार नाही तोपर्यंत दाढी करणार नाही असा संकल्प दुलाराम यांनी केला होता. गाय घरी आल्याने संपूर्ण कुटुंब आंनदी असून त्यांच्या या आनंदात गावकरीही सामील झाले होते.
[ad_2]