Mystery Of Well Preserved Body,२००० वर्षांची मुलगी, लाल केस, दात गायब अन्… गूढ उकलताच शास्त्रज्ञही हादरले – 2000 year old girl well preserved body with red hairs mystery revealed scientists shocked

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

आम्सटरडॅम: २००० वर्षांच्या मुलीशी संबंधित आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. तिचे केस लाल रंगाचे होते. अवशेष सापडण्याच्या १०० वर्षांहून अधिक काळापूर्वी तिचा मृत्यू कसा झाला असेलहे शोधण्याचा शास्त्रज्ञ अजूनही प्रयत्न करत आहेत. मे १८९७ मध्ये, दोन मजूर नेदरलँडमध्ये खोदकाम करत असताना त्यांना या मुलीचा मृतदेह सापडला होता. हा मृतदेह चांगल्या परिस्थितीत होता. मृतदेह कुजलेला असला तरी त्यावर लाल रंगाचे केस स्पष्ट दिसत होते.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, तज्ज्ञांच्या मते मृत्यूच्या वेळी या मुलीचे वय १६ वर्षे होते. जे 54 बी. सी. इ.स. १२८ च्या दरम्यान ही घटना घडली असावी. तिचा भयंकर पद्धतीने मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. मुलीच्या गळ्यात दोरी बांधून तिच्यावर चाकूने वार केल्याचे दिसून आले आहे. तिचे अर्धे केसही कापले गेले होते आणि दातही गायब होते. वॅगेनिंगेन विद्यापीठाचे डॉ. रॉय व्हॅन बीक म्हणाले, या प्रकरणी दोन सिद्धांत माांडण्यात आले आहेत. पहिला म्हणतो की जे लोक पारंपारिक नियमांनुसार जगत नव्हते ते या मृत्यूमध्ये सामील आहेत. असे मृतदेह व्यभिचारात दोषी आढळलेल्या लोकांचे असण्याची शक्यता आहे.

७ फूट उंची, पिवळे डोळे अन्… येथे एलियन्सच्या हल्ल्याचा दावा, दहशतीमुळे लोकांची झोप उडाली
दुसरा सिद्धांत असा आहे की कदाचित मुलीचा बळे देण्यात आला असावा. कुठली महान शक्ती प्राप्त करण्यासाठी तिचा बळी देण्यात आला असावा. तिला मणक्याच्या आजाराने ग्रासल्याचे संशोधनातून समोर आले आहे. तिची लांबी सुमारे साडेचार फूट होती. काही अहवालांमध्ये असे म्हटले आहे की तिचा मृत्यू बेशुद्ध अवस्थेत झाला असावा, कारण तिच्या हातावर अशा कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत, ज्यावरून असे दिसून येते की तिने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.

प्रेमात अडथळा, आईसोबत सतत भांडण; मुलीनं आई अन् प्रियकराच्या मदतीने वडिलांचा काटा काढला

दलदलीच्या पाण्यात असलेल्या टॅनिक अॅसिडमुळे मुलीची त्वचा आणि इतर गोष्टी चांगल्या प्रकारे जतन केलेल्या आढळल्या आहेत. शोधानंतर, मुलीचा मृतदेह प्रदर्शनात ठेवण्यात आला आणि १९९२ पर्यंत अवशेषांवर कोणतेही संशोधन केले गेले नव्हते.

एकाच देशात दिसले १००० यूएफओ, शास्त्रज्ञांनी सांगितलं कुठे लपले आहेत एलियन्स, पहा…

[ad_2]

Related posts