[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
IND Vs WI 5th T20 Live Updates : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज निर्णायक आणि अखेरचा टी20 सामना होणार आहे. पाच सामन्याच्या टी20 मालिकेत भारताने 2-2 अशी बरोबरी केली आहे. वेस्ट इंडिजने सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली होती. पण त्यानंतर सलग दोन सामन्यात भारताने विजय मिळवत भारताने बरोबरी केली होती. आज दोन्ही संघामध्ये निर्णायक टी 20 सामना होणार आहे. विजेता संघ मालिका खिशात घालणार आहे. अनुभवी वेस्ट इंडिज आणि युवा भारतीय संघ जेतेपदासाठी मैदानावर उतरणार आहे.
भारतीय संघाने लागोपाठ दोन सामने जिंकून जबरदस्त कमबॅक केले. शुभमन गिल आणि यशस्वी जायस्वाल यांनी जबरदस्त सलामी दिली होती. मधल्या फळीत सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माही फॉर्मात आहेत. हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि संजू सॅमसन यांच्या फॉर्माची चिंता कायम आहे. अखेरच्या सामन्यात भारतीय फलंदाज प्रभावी कामगिरी करतील. भारताची गोलंदाजीही प्रभावी आहे. चहल आणि कुलदीप यांच्या फिरकी माऱ्याला अर्शदीप आणि मुकेश कुमार यांच्या भेदक माऱ्याची जोड आहे. दुसरीकडे अनुभवी वेस्ट इंडिजही विजयासाठी उतरणार आहे. निकोलस पूरन, शाय होप, काइल मायर्स, शिमरोन हेटमायर आणि रोवमन पॉवेल भन्नाट फॉर्मात आहेत. त्याशिवाय गोलंदाजीतही विंडिजचे खेळाडू अनुभवी आहेत. तळापर्यंत दर्जेदार फलंदाज ही विंडिजची जमेची बाजू आहे. त्यामुळे आजचा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. आज कोणता संघ बाजी मारणार? याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागलेय.
भारत आणि वेस्ट इंडिज दोन्ही संघात आजच्या सामन्यात बदलाची शक्यता कमीच आहे. हार्दिक पांड्या आणि पॉवेल आपला संघ कायम ठेवण्याची शक्यता आहे. संध्याकाळी आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. साडेसात वाजता नाणेफेक होईल. फ्लोरिडाची खेळपट्टी फलंदाजांना पोषक आहे. त्यामुळे धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कॅरेबिअन फलंदाजांना रोखण्याचे युवा भारतीय संघापुढे आव्हान असेल.
हेड टू हेड –
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आतापर्यंत 29 आंतरराष्ट्रीय टी 20 सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 19 सामने जिंकलेत तर विडिंजला नऊ सामन्यात विजय मिळालाय. एका सामन्याचा निकाल लागला नाही.
कोण वरचढ ?
भारताच्या युवा टीमपुढे तगड्या वेस्ट इंडिजचे आव्हान आहे. कागदावर विडिंजचा संघ वरचढ दिसतोय. पहिल्या तिन्ही सामन्याची खेळपट्टी संथ होती, पण अखेरचा सामना अमेरिकेतील फ्लोरिडा येथे होत आहे. या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडतो, त्यामुळे आजचा सामना हायस्कोरिंग असेल. आजच्या सामन्यात विडिंजचे पारडे जड दिसतेय. पण युवा भारतीय संघ पटलावर करु शकतो.
भारताची संभाव्य प्लेईंग 11
यशस्वी जायस्वाल, शुभमन गिल, सुर्यकुमार यादव (उपकर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार
वेस्ट इंडिजची संभाव्य प्लेईंग 11
ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोवमैन पॉवेल (कर्णधार), शिम्रोन हेटमायर, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, अकील होसेन, ओबेद मैककॉय
[ad_2]