CSK Played With Most Unchanged XIIs In League Stage Of IPL 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

CSK, IPL 2023 : धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईने प्लेऑफमध्ये धडक मारली. चेन्नई संघाने आतापर्यंत सर्वाधिक वेळा प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. चेन्नई संघ का यशस्वी होतोय.. याचा प्रत्येकजण विचार प्रत्येकजण करतो.. पण यातील सर्वात मोठं कारण.. धोनी होय..  धोनीने संघातील खेळाडूंवर विश्वास दाखवलाय. तो यशस्वी होऊ दे अथवा न होऊ दे… त्याला संघातून वगळले नाही. यंदाच्या हंगामात अनचेंज असणारा संघ चेन्नईचा ठरलाय. धोनीने १४ सामन्यात नऊ वेळा संघात एकदाही बदल केला नाही. दुसरीकडे प्लेऑफमधून बाहेर पडलेला आरसीबी संघाने दोन वेळा संघात बदल केला नाही… आरसीबीच्या संघाने १२ सामन्यात संघात बदल केला. 

चेन्नईच्या संघाने आपल्या खेळाडूवर सर्वाधिक वेळा विश्वास दाखवलाय. त्यामुळेच चेन्नई संघाला यश मिळालेय. दुसरीकडे गुजरातने चार वेळा संघात बदल केला नाही. तर कोलकाता आणि पंजाब संघाने तीन तीन वेळा संघात बदल केला नाही.. या पाच जणांचा अपवाद वगळता इतर पाच संघांनी प्रत्येकवेळा संघात एकतरी बदल केलाय.  धोनीने संघात बदल न करण्याची ही पहिलीच वेळ नाही… याआधीही प्रत्येक हंगामात चेन्नई आपल्या खेळाडूंवर विश्वास दाखवलाय. प्रत्येक सामन्यासाठी चेन्नईचा संघ जवळपास सारखाच असतो.. एखादा खेळाडू अपयशी ठरत असेल तरी त्याच्यावर विश्वास कायम ठेवला जातो.. चेन्नईच्या यशाचे हेच प्रमुख कारण ठरलेय.

अंतिम फेरीच्या तिकीटासाठी गुजरात आणि चेन्नई आमने-सामने

इंडियन प्रीमियर लीग 2023 चा पहिला क्वालिफायर सामना आज चेन्नईच्या चेपॉक मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. या रोमांचक लढतीसाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहे. या मोसमात सुरुवातीपासून गतविजेत्या गुजरात संघाची दमदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. गुजरात संघाचे साखळी 14 सामन्यांपैकी एकूण 10 सामने जिंकले असून 20 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं. दुसरीकडे, चार वेळा विजेतेपद पटकावलेल्या चेन्नई संघाने 14 पैकी आठ सामने जिंकून 17 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश केला. गुणतालिकेत चेन्नई दुसऱ्या स्थानावर आहे. गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानावर असलेल्या संघांना पहिल्या क्वालिफायरमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.

धोनीचा अनुभव की पांड्याची आकडेवारी, कोण ठरणार वरचढ? 

आयपीएल 2023 मधील पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात आणि चेन्नई संघ भिडतील आणि विजेता संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. तर पराभूत होणाऱ्या संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी आणखी एक संधी असेल. गुजरातने अंतिम फेरीत प्रवेश करून विजय मिळवल्यास गुजरात सलग दुसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावणारा संघ बनेल. तसेच, चेन्नई संघाला पाचव्यांदा चॅम्पियनचा होण्याची संधी आहे.

[ad_2]

Related posts