IND vs IRE T20I Series Schedule and Squad Jasprit Bumrah led Team India Left for Ireland Tour See Photos; जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली ‘नवी’ टीम इंडिया आयर्लंडला रवाना, असं आहे मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर आता टीम इंडिया पुढील मिशनसाठी सज्ज झाली आहे. वेस्ट इंडिजनंतर भारताचे मिशन आयर्लंड आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ मंगळवारी सकाळी आयर्लंडला रवाना झाला. टीम इंडिया आयर्लंडमध्ये तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. अनेक खेळाडूंसाठी ही एक महत्त्वाची मालिका असेल पण सर्वांच्या नजरा जसप्रीत बुमराहवर असतील. बुमराह राष्ट्रीय संघात पुनरागमन करत आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. जे या दौऱ्यासाठी खूप उत्सुक दिसत आहेत.

बुमराह प्रदीर्घ कालावधीनंतर तंदुरुस्त झाल्यानंतर संघात पुनरागमन करत आहे. २०२३ च्या आशिया चषकापूर्वी ही त्याच्यासाठी खूप महत्त्वाची मालिका ठरेल. येथे त्याचा मॅच फिटनेस कळणार आहे. याशिवाय अनेक युवा खेळाडू आहेत ज्यांना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे, तर काही खेळाडूंचे भारताच्या जर्सीमध्ये सामने खेळण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

३ खेळाडूंना पदार्पणाची संधी

टीम इंडियाने आयरिश टी-२० मालिकेसाठी १५ सदस्यीय संघ निवडला आहे. यामध्ये तीन खेळाडू आहेत ज्यांना पदार्पणाची संधी मिळू शकते. यामध्ये प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंग आणि जितेश शर्मा यांचा समावेश आहे. रिंकू सिंग आणि जितेश शर्मा यांनी आयपीएल २०२३ मध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. हे दोन्ही खेळाडू त्यांच्या धारदार फलंदाजीसाठी ओळखले जातात. रिंकू सिंगने मॅच फिनिशर म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. त्याचबरोबर जितेश शर्माच्या फलंदाजीची तुलना ऋषभ पंतशी केली गेली, ही खूप मोठी गोष्ट आहे.

हार्दिकने पूरनला दिल होतं चॅलेंज, आधी मैदानात २ षटकार मारले अन् आता इंस्टाग्रामवर घेतला बदला
प्रसिद्ध कृष्णा भारताकडून एकदिवसीय क्रिकेट खेळला आहे, परंतु त्याला प्रथमच टी-२० क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी या मालिकेच्या निमित्ताने मिळणार आहे. कृष्णाकडे वेग आणि बाऊन्स दोन्ही आहेत आणि याच कारणामुळे विराट कोहलीसारखे खेळाडूही त्याला लोहा मानतात. दुसरीकडे, संजू सॅमसनसाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत संजू फ्लॉप ठरला होता. सॅमसनने टीम इंडियासाठी १९ टी-२० डाव खेळले असून त्याची सरासरी १९ पेक्षा कमी आहे. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत फक्त एकच अर्धशतक झळकले आहे. आता जर तो आयर्लंडविरुद्धही खेळला नाही तर त्याला संघातून वगळले जाऊ शकते.

कर्णधारपद हार्दिक पंड्याला शोभत नाही? भारताच्या भावी Captainची कामगिरी तरी पाहा
अहवालाच्या मते, आयर्लंड संघ डब्लिनमध्ये दोन स्वतंत्र गटांमध्ये एकत्र येईल. वेस्ट इंडिज मालिकेतील खेळाडू मियामीहून थेट डब्लिनला जाणार आहेत, तर उर्वरित खेळाडू मंगळवारी सकाळी मुंबईहून निघाले आहेत.

निकोलस पूरनला अर्शदीप सिंग आणि ब्रँडन किंगमुळे झाली दुखापत, स्वतः फोटो केले शेअर

आयर्लंड मालिकेचे वेळापत्रक

पहिला टी-२० सामना – १८ ऑगस्ट, मालाहाइड

दुसरा टी-२० सामना – २० ऑगस्ट, मालाहाइड

तिसरा टी-२० सामना – २३ ऑगस्ट, मालाहाइड

सेलिब्रेशनची अति घाई अन् हातची विकेट गेली

टीम इंडियाचा संघ :
जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान.

[ad_2]

Related posts