Kishor Aware Murder Case By Ex Corporator Son Gaurav Khalde Killed Kishor Aavare

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Kishor Aware Murder case : पुण्यातील तळेगावच्या जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणाने नवं वळण घेतलं आहे. माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदला घेण्यासाठी या हत्येचं कट रचल्याचं पोलीस तपासात समोर आलेलं आहे. आता गौरवने हा कट का रचला?, त्यामागचं कारण हे जुन्या नगरपरिषद इमारतीपर्यंत जाऊन पोहोचलं आहे. माजी नगरसेवक भानू खळदे यांच्याविरोधात वृक्षतोड केल्याची तक्रार किशोर आवारे यांनी नगरपरिषदेच्या सीईओकडे केली होती. मात्र बांधकाम साईटच्या मार्गालगतची ही वृक्षतोड परवानगीने होती, असा दावा भानू खळदे यांनी केला होता. मात्र यावरुन आवारे यांनी भानू खळदे यांना सर्वांदेखत मुस्काडात लावली. याच अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलगा गौरव खळदेनी हत्येचा कट रचल्याचं समोर आलं आहे. 

गौरव खळदे कोण आहे आणि हत्येचा कट कसा रचला?

गौरव हा माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा आहे. तो सिव्हिल इंजिनिअर आहे. कुटुंबाचा बांधकाम व्यवसाय सांभाळायचा. तो शांत आणि संयमी स्वभावाचादेखील आहे. हत्या करणारा श्याम निगडकरशी त्याची मैत्री होती. गौरव श्यामला पैसे खर्चासाठी द्यायचा. याच दरम्यान गौरव यांच्या वडिलांच्या म्हणजेच भानू खळदे यांना किशोर आवारे यांनी डिसेंबरमध्ये सर्वांदेखत थोबाडीत लगावली. यावरुन गौरवचे मित्र त्याची चेष्टा करायचे, त्याला हिणवायचे. त्यामुळं संतापलेल्या गौरवने किशोरचा काटा काढायचं ठरवलं. जानेवारी पासूनच हत्येचा कट रचायला सुरुवात केली. श्यामकडून ही हत्या करुन घ्यायचं ठरलं. आर्थिक मदत करणाऱ्या मित्रासाठी श्यामने होकार दिला होता. श्याम आणि रघु उर्फ प्रवीण धोत्रे सोबत हत्या कशी करायचं हे ठरवलं. श्याम आणि प्रवीणने इतर मित्रांना सोबतीला घेतलं. गेल्या महिन्यापासून रेकी करायला सुरुवात झाली. अखेर शुक्रवारी दुपारी नगरपरिषद कार्यालयात किशोर आवारेला गाठण्यात आलं. 

कानशिलात का लगावली होती?

डिसेंबर 2022 मध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात किशोर आवारे आणि चंद्रभान खळदे यांच्यात एका विषयावरुन वाद झाला होता. त्यानंतर आवारे यांनी सर्वांसमक्ष चंद्रभान खळदे यांच्या कानाखाली मारलेली होती. वडील चंद्रभान खळदे आणि आई हेमलता खळदे हे दोघे माजी नगरसेवक आहेत. हेमलता खळदे या किशोर आवारे यांच्यासोबत जनसेवा विकास समिती माध्यमातून सुरुवातीला कार्यरत होत्या आणि त्याच माध्यमातून नगरसेवक पदावरही निवडून आलेले होत्या.

[ad_2]

Related posts