Indian Cricket Team Player Ishan Kishan New -look Viral Video Latest Sports News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ishan Kishan New Look : आशिया चषकाच्या आधी विकेटकीपर ईशान किशन याने नवीन लूक केला आहे.  ईशान किशन याचा  नव्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये ईशान किशन नव्या लूकवर काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच ईशान किशनची हेअर स्टाइल (hairstyle) पूर्णपणे बदलली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर ईशान किशनटी नवीन लूक व्हायरल 

ईशान किशन याने आपल्या इन्स्टाग्रामवर नव्या हेअरस्टाईलचा व्हिडीओ आणि फोटो पोस्ट केला आहे. ईशान किशन याच्या लूकची सध्या जोरदार चर्चा होत आहे. त्याचा नवीन लूक सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. नेटकरी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहे. आशिया चषकाआधी ईशान किशन याचा आवतार लोकांच्या पसंतीस पडलाय. काही नेटकऱ्यांनी त्याला स्टाईलपेक्षा खेळण्याकडे लक्ष्य द्यायचा सल्ला दिलाय.  


वेस्ट इंडिज दौऱ्यातून नुकताच परतलाय ईशान किशन…

ईशान किशन भारतीय संघासोबत वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला होता. कसोटी, वनडे आणि टी20 मालिकेनंतर तो भारतात परतलाय. कसोटी आणि वनडेमध्ये ईशान किशन याने दमदार कामगिरी केली होती. वेस्ट इंडिजविरोधात ईशान किशन याने लागोपाठ तीन अर्धशतके ठोकण्याचा पराक्रम केला होता. पण टी20 मालिकेत ईशान किशन याला मोठी खेळी करता आली नव्हती. त्यानंतर ईशान किशन याच्या जागी यशस्वी जायस्वाल याला संधी देण्यात आली होती. 

दरम्यान, ईशान किशन त्याच्या नवीन लूकमुळे नेहमीच चर्चेत असतो. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ आयर्लंडला पोहोचला आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यात 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्याचबरोबर या मालिकेत जसप्रीत बुमराह भारतीय संघाचा कर्णधार असेल. या दौऱ्यात ईशान किशन याला आराम देण्यात आला आहे. संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांना अंतिम संघात सहभागी केलेय. 30 ऑगस्टपासून आशिया चषक होणार आहे. यामध्ये ईशान किशन याला संधी मिळू शकते.




[ad_2]

Related posts