Wrestler Vinesh Phogat ruled out of the 19th Asian Games in Hangzhou following an injury in her left knee during training ; ‘गोल्डन गर्ल’ विनेश फोगटने का घेतली आशियाई स्पर्धेतून माघार, जाणून घ्या खरं कारण….

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : चाचणीविनाच विनेश फोगटची आशियाई क्रीडा कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली होती; पण चीनमध्ये होणाऱ्या या स्पर्धेतून विनेशने गुडघा दुखावल्यामुळे माघार घेतली आहे. विनेशच्या माघारीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेच्या चाचणीत विजेतेपद मिळवलेल्या अंतिम पंघलचा भारतीय संघात समावेश झाला आहे.

विनेशने २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तिने आपल्याला १३ ऑगस्टला दुखापत झाली तसेच दुखावलेल्या गुडघ्यावर १७ ऑगस्टला मुंबईत शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगितले आहे. विनेश यामुळे जागतिक स्पर्धेसाठी होणाऱ्या चाचणीतही सहभागी होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड चाचणी २५ आणि २६ ऑगस्टला पतियाळात होणार आहे.

‘एक दुःखद बातमी आपल्याला सांगायची आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजेच १३ ऑगस्टला सराव करताना माझा डावा गुडघा दुखावला. लगेच स्कॅन करण्यात आले तसेच डॉक्टरांनी तपासणी केली. शस्त्रक्रिया हाच पर्याय असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. माझ्या दुखावलेल्या गुडघ्यावर १७ ऑगस्टला मुंबईत शस्त्रक्रिया होणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक राखणे हे माझे स्वप्न होते. मात्र आता दुखापतीमुळे ते प्रत्यक्षात येणार नाही’, असे ट्वीट विनेशने केले आहे.

विनेश तसेच बजरंगची आशियाई क्रीडा कुस्ती संघात थेट निवड करण्याचा निर्णय भारतीय कुस्ती महासंघावरील हंगामी समितीने गेला. निवड चाचणी जिंकल्यावर विनेशच्या गटातील विजेती अंतिम पंघल तसेच बजरंगच्या गटातील विजेता विशाल कालीरमन यांना राखीव ठेवण्यात आले होते. त्यास अंतिम तसेच विशालने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती. आता विनेशच्या माघारीमुळे अंतिमचा आशियाई क्रीडा सहभाग जवळपास निश्चित झाला आहे. दरम्यान, खाफ पंचायतीने पुन्हा एकदा पंघल तसेच कालीरामनच्या समावेशाची मागणी केली होती.

मराठमोळ्या अदिती स्वामीचा तिरंदाजी स्पर्धेत विश्वविक्रम; 16 व्या वर्षी घडवला इतिहास, भारताचं नाव उंचावलं

‘माझ्याऐवजी राखीव खेळाडूस आशियाई क्रीडा स्पर्धेस पाठवण्यात यावे’, असे विनेशने भारतीय कुस्ती महासंघास कळवले आहे. १९ वर्षीय अंतिम पंघल सध्या जागतिक २० वर्षाखालील स्पर्धेसाठी जॉर्डनला गेली आहे. आशियाई क्रीडा कुस्ती स्पर्धेतील महिलांच्या विभागातील ५३ किलो गटात ती आता भारताचे प्रतिनिधित्त्व करणार आहे.

[ad_2]

Related posts