Shreyas Iyer and K L Rahul Fitness Test Date Fixed For Asia Cup 2023 Selection ; आराम बस्स, आता श्रेयस आणि राहुलची अग्निपरीक्षा, पाहा निवड समितीने कधीपर्यंतचा दिला अल्टीमेटम

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बेंगळुरू : श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल हे दोन्बी भारताचे मॅचविनर बऱ्याच काळापासून संघाबाहेर आहेत. या दोघांना दुखापत झाली होती. पण आता हे दोघे दुखापतीमधून सावरले आहेत. त्यानंतर आता त्यांना निवड समितीने एक अल्टीमेटम दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे आता श्रेयस आणि राहुल यांची अग्निपरीक्षा असणार आहे.

भारतीय निवड समिती सध्याच्या घडीला आशिया चषकाचा विचार करत आहे. आशिया चषक स्पर्धेत ज्या खेळाडूंची निवड होईल, त्यांना वनडे वर्ल्ड कपमध्ये संधी मिळण्याची सर्वात जास्त शक्यता आहे. त्यामुळे आता निवड समितीने काही ठोस पावले उचलायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच आता निवड समितीने श्रेयस अय्यर आणि के एल राहुल यांच्याबाबत एक मोठा निर्णय घेण्याचे ठरवले आहे.

लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यरची येत्या शुक्रवारी तंदुरुस्तीची चाचणी होईल आणि त्यानंतर आशिया कप वनडे स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड होईल, असे समजते. या दोघांच्या चाचणीनंतरच संघनिवड करण्याचा निर्णय निवडसमिती तसेच संघव्यवस्थापनाने घेतला असल्याचे भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (बीसीसीआय) सुत्रांनी सांगितले. श्रेयस तसेच राहुलने सराव सुरू केला आहे. ते सध्या ८० टक्के ‘मॅच फिट’ आहेत. आशिया कपसाठी अजून १८ दिवस आहेत, त्यामुळे तोपर्यंत ते तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे. मात्र निवड समिती कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. हे दोघेही तंदुरुस्त असल्यास सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यापैकी एकालाच संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शुक्रवारी होणाऱ्या तंदुरुस्ती चाचणीमध्ये नेमकं काय होणार, याची उत्सुकता सर्वांना असणार आहे. या एका चाचणीमुळे श्रेयस आणि राहुल यांचे भविष्य स्पष्ट होऊ शकते. कारण जर ते या चाचणीत अपयशी ठरले तर त्यांना वर्ल्ड कपला मुकावे लागू शकते आणि हा त्यांच्या करीअरसाठी एक मोठा धक्का असून शकतो. त्यामुळे आता या दोघांच्या चाचणीचा निकाल काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

श्रेयस आणि राहुल यांच्यापैकी एकजरी खेळाडू फिट ठरला तर भारताच्या चौथ्या क्रमांकाचा प्रश्न मिटू शकतो, असे म्हटले जात आहे.

[ad_2]

Related posts